Jalgaon News: ‘एसीबी’च्या पथकावर गाडी घालत अभियंता पसार!

Jamner येथे सहा लाखांची लाच स्विकारणाऱ्या अभियंत्यांने `एसीबी` पथकावर गाडी घातली.
ACB
ACB Sarkarnama

जामनेर : लघु उद्योगासाठी योजनेतून (Small Scale industry) डीपी मंजूर करून देण्यासाठी सहा लाखांची लाच मागणाऱ्या नेरीतील महावितरणच्या (MSEDCL) सहाय्यक अभियत्यांवर औरंगाबाद लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शुक्रवारी सापळा रचला. ठरल्याप्रमाणे तक्रारदार अभियंत्याच्या शिवाजीनगरातील घरीदेखील पोहोचले. मात्र संशयित हेमंत शालिग्राम पाटील (Hemant Patil) याला सुगावा लागल्याने त्याने घराबाहेर पडून चारचाकीतून पोबारा केला. (Engineer run away after ACB reid while taking six lacs bribe)

ACB
Congress News: मोदी सरकारचे धोरण म्हणजेच सामन्यांचे मरण!

एसीबीचे पथक आरोपीला पकडण्यासाठी पुढे आल्यानंतर पथकाच्या अंगावरही आरोपीने चारचाकी घातली. ही सिनेस्टाईल घटना जामनेर शहरात शुक्रवारी (ता. ५) सकाळी अकराला घडल्यानंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याचे सांगण्यात आले.

ACB
BJP News: भाजप सत्तेत तरीही वीज खंडीत करण्याचे आदेश!

सहा लाखांची लाच मागणी अंगलट

एका तक्रारदाराला लगु उद्योगासाठी वीज डीपी हवी असल्याने त्यासाठी १४ लाखांचे कोटेशन लागेल मात्र मी तुम्हाला फुकटात डीपी मिळवून देतो. मात्र त्यासाठी सहा लाखांची लाच लागेल, असे संशयित आरोपी हेमंत शालिग्राम पाटील याने सांगितले. तक्रारदाराने जळगाव, नाशिकऐवजी थेट औरंगाबाद एसीबीकडे तक्रार केली. सुमारे दोन महिन्यांपासून पथक आरोपीच्या मागावर होते. मात्र यापूर्वी एकदादेखील आरोपीने लाचेबाबत संशय आल्याने ती स्वीकारली नव्हती.

एसीबी पथकाच्या अंगावर घातली गाडी

पथकाने गुरुवारी सकाळी अकराला ट्रॅप लावला, तक्रारदार संशयित आरोपीच्या घरी लाचेची सहा लाखांची रक्कम घेऊन पोहोचला. या वेळी संशयिताने कामाचे निमित्त करून बाहेर पडला. त्यावेळी घराबाहेर असलेली गर्दी पाहून संशय बळावल्याने त्याने थेट चारचाकी काढली त्यातून निसटण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी एसीबीने त्याच्यावर झडप घातली असता आरोपीने पथकाच्या अंगावरच गाडी घालण्याचा प्रयत्न केला, अशी सूत्रांची माहिती आहे. या प्रकरणी जामनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून, आरोपीचा कसून शोध सुरू करण्यात आला आहे.

-----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in