शिंदखेडा पंचायत समितीचा लाचखोर कर्मचारी जाळ्यात

‘एसीबी‘ची धुळ्यातील दत्तमंदिर चौकात ग्रामसेवकाकडून लाच घेताना झाली कारवाई.
Kiran More
Kiran MoreSarkarnama

धुळे : अंतिम वेतन प्रमाणपत्रासाठी ग्रामसेवकाकडे आठ कर्मचारी शहरातील देवपूरमधील सापळ्यात अडकला. येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी सकाळी ही कारवाई केली. किरण मोरे (Kiran More) असे लाच स्वीकारणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये (ACB) गुन्हा दाखल केला. (Panchayat samiti employee trapped by acb in Shindkheda)

Kiran More
वाघ, वाघीण अन् आता वाघोबाही गेले, उरले केवळ मावळे…

शिंदखेडा पंचायत समितीअंतर्गत वाघाडी खुर्द येथील तक्रारदार ग्रामसेवकाची पदोन्नतीने ग्रामविकास अधिकारीपदी शिरपूर पंचायत समिती येथे बदली झाली. ते १८ एप्रिलला कार्यमुक्त झाले. अंतिम वेतन प्रमाणपत्रासाठी शिंदखेडा पंचायत समितीचा कनिष्ठ सहाय्यक किरण मोरे याची ते वेळोवेळी भेट घेतली. मोरे याने त्यांच्याकडे आठ हजारांची मागणी केली. या प्रकरणी संबंधित ग्रामविकास अधिकाऱ्याने धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दूरध्वनीद्वारे तक्रार केली. गटविकास अधिकारी देवरे याने अंतिम वेतन प्रमाणपत्र देण्यासाठी समक्ष बोलाविले आहे. त्यांच्याशी या विषयावर चर्चा करून अंतिम वेतन प्रमाणपत्र देण्याबाबतची माहितीदेखील तक्रारदाराने केली.

Kiran More
एमआयएम आक्रमक; गुगलमॅप विरोधात तक्रार दाखल करणार

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शिंदखेडा येथे तक्रारदाराची भेट घेत तक्रार नोंदविली. सोमवारी (ता. १८) तक्रारीची पडताळणी केली असता कनिष्ठ सहाय्यक किरण मोरे याने तक्रारदाराकडे अंतिम वेतन प्रमाणपत्राकरिता गटविकास अधिकारी देवरे यांच्यासाठी चार हजार व स्वतःसाठी दोन हजार, अशी एकूण तडजोडीअंती सहा हजारांची मागणी केली. ही रक्कम धुळे येथे द्यावी, असेही त्याने सांगितले. किरण मोरे याने तक्रारदाराला मंगळवारी सकाळी पावणेनऊला शहरातील देवपूरच्या दत्तमंदिर चौकात प्रमाणपत्र घेण्यासाठी बोलावले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. सहा हजारांची लाच स्वीकारताना संशयित मोरे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. विभागाचे पोलिस उपअधीक्षक अनिल बडगुजर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक मंजितसिंग चव्हाण, प्रकाश झोडगे, राजन कदम, शरद काटके, कैलास जोहरे, भूषण खलाणेकर, संतोष पावरा, भूषण शेटे, गायत्री पाटील, संदीप कदम, रामदास बारेला, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, प्रशांत बागूल, प्रवीण पाटील, वनश्री बोरसे, रोहिणी पवार आदींनी ही कारवाई केली.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in