‘वैधमापन’चा निरीक्षकाचेच `मापात पाप` तर जावे कुठे?

‘वैधमापन’ विभागाचा निरीक्षकास लाच घेताना केले गजाआड
ACB Action
ACB ActionSarkarnama

जामनेर : पेट्रोलपंपावरील (Fuel Pump) नोझल मशिनचे स्टँपिंग प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात वैधमापनशास्त्राच्या निरीक्षकाने ६ हजार रुपयांची (Bribe) लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाच्या (ACB) अधिकाऱ्यांनी लावलेल्या सापळ्यात रंगेहात पकडण्यात आले असून, विवेक सोनू झरेकर (रा. पाचोरा, वय ५४ ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (ACB registers a FIR against inspector in Jalgaon)

ACB Action
नाशिकमध्ये शिंदे गटाच्या पडला ऐक्यात मिठाचा खडा?

पेट्रोल पंपावरील नोझलद्वारे ग्राहकांना नेमकेपणाने इंधन मिळावे यासाठी विविध यंत्रणा सक्रीय आहेत. सततच्या वाढत्या इंधन दरामुळे याबाबत नागरिकांत देखील चिंता असते. त्यामुळे याबाबत वैधमापण शाश्त्र विभागाची जबाबदारी मोठी असते, मात्र ती यंत्रणाही कुचकामी ठरत असल्याचे या प्रकारातून दिसले.

ACB Action
ठेवी परत करण्यासाठी लवकरच पॅकेज देण्याचे आश्वासन

पहूर येथील ‘जय बालाजी पेट्रोलियम’ पेट्रोलपंपावर चार नोझल मशिन आहेत. या नोझल मशिनचे स्टॅम्पिंग करून प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात १ नोझल मशिन स्टँपिंगचे प्रत्येकी १५०० रुपये याप्रमाणे ४ नोझल मशिनचे शासकीय फी व्यतिरिक्त तक्रारदार यांच्याकडे वैधमापनशास्त्र निरीक्षक विवेक झरेकर यांनी पंचासमक्ष एकूण सहा हजार रुपये लाचेची मागणी केली.

मागणी केलेली लाच रक्कम झरेकर यांनी स्वतः पंचासमक्ष पहूर ते जळगाव रस्त्यावरील हॉटेल अजिंक्य येथे स्वीकारली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हॅश व्हॅल्यू घेण्यात आली असून, फोटोग्राफ घेण्यात आले आहेत.

ही कारवाई जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तपास अधिकारी तथा पोलिस उपअधीक्षक शशिकांत पाटील, पोलिस निरीक्षक एस. के. बच्छाव, पोलिस निरीक्षक एन. एन. जाधव, पोलिस कर्मचारी ईश्वर धनगर, राकेश दुसाने, सचिन चाटे यांनी केली. ही कारवाई नाशिक परीक्षेत्राचे पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलिस अधीक्षक एन. एस. न्याहळदे, पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in