भाजप आमदार सीमा हिरे- सुप्रिया सुळे यांचा फोटो व्हायरल !
NCP leader Supriya sule & BJP leader Seema HireSarkarnama

भाजप आमदार सीमा हिरे- सुप्रिया सुळे यांचा फोटो व्हायरल !

सोशल मीडियावर व्हायरल झाले सुप्रिया सुळे व सीमा हिरे यांचे छायाचित्र.

सिडको : भारतीय जनता पक्षाच्या आमदार सीमा हिरे यांनी नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. ही सहज झालेली सदीच्छा भेट होती. मात्र त्याचे छायाचित्र सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने शहरात वेगळीच चर्चा सुरु झाल्याने खळबळ उडाली.

NCP leader Supriya sule & BJP leader Seema Hire
धक्कादायक... महापालिका निवडणुकीसाठी जनता दलाने मालेगावला दंगल घडवली?

सध्या महापालिका व जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचे वारे वाहत असतानाच नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातील भाजप आमदार सीमा हिरे व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या सोबतच्या भेटीचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने हिरे समर्थकांत तो चर्चेचा विषय होता.

NCP leader Supriya sule & BJP leader Seema Hire
छत्तीसगडचे मुख्यमंत्री बघेल यांना पुण्यात महात्मा फुले समता पुरस्कार!

नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मागील दोन दौऱ्यामध्ये शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्या उपस्थितीत भाजपच्या दोन नगरसेवकांची हजेरी दिसून आली. या नगरसेवकांच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर नुकतेच आमदार सीमा हिरे यांनी मुंबईतील मंत्रालयात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेऊन चर्चा केल्यानंतरचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. यानंतर हिरे यांच्या समर्थकांमध्ये उलटसुलट चर्चा ऐकायला मिळत आहे. याबाबत खासदार सुळे व आमदार सीमा येथे यांचा फोटो व्हायरल करणाऱ्या भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सुशील नाईक यांच्याशी बोलणे केले असता, त्यांनी बुधवारी एका कामानिमित्त ही भेट झाल्याचे सांगितले. ही भेट राजकीय नसल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.

...

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in