भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर गुन्हा दाखल

या प्रकरणी पोलीस कर्मचारी राकेश दुसाने यांनी फिर्याद दिली आहे.
Girish Mahajan
Girish Mahajansarkarnama

जळगाव : जळगाव येथे मोर्चा काढून जमावबंदी चे उल्लघन केल्या प्रकरणी भाजप नेते गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यासह भाजप (BJP) नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Girish Mahajan
सुजय विखे विरुद्ध निलेश लंके या लढाईच्या सेमीफायनलची तयारी जोरात

भारतीय जनता पक्षाच्या वतीने सोमवार (ता.१) रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी मोर्चा काढण्यात आला होता. जळगाव जिल्ह्यात जिल्हाधिकारी यांनी जमावबंदीचे आदेश लागू केले आहेत. तसेच कोविडचे निर्बंध देखील सुरू आहेत. अशात भारतीय जनता पक्षाने मोर्चा काढून हजारोंचा जमाव एकत्र केला होता.

Girish Mahajan
शिस्तीच्या भाजपाला बेशिस्तपणाचे ग्रहण; मंचावरील गर्दीने "पंकजाताई" भडकल्या!

या प्रकरणी पोलीस कर्मचारी राकेश दुसाने यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन माजी मंत्री गिरीश महाजन, भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सुर्यवंशी, खासदार उन्मेश पाटील, रक्षा खडसे, आमदार सुरेश भोळे, मंगेश चव्हाण, चंदुलाल पटेल, संजय सावकारे, जिल्हा परिषद अध्यक्षा रंजना पाटील, उपाध्यक्ष लालचंद पाटील यांच्या विरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलिस करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com