Nashik News: त्र्यंबकेश्वर मंदिरातील 'त्या' व्हायरल व्हिडीओ प्रकरणी मोठी अपडेट ; फडणवीसांनी दिले 'हे' महत्वाचे आदेश

Trimbakeshwar Temple News: काही अन्य धर्मियांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात बळजबरीने शिरकाव करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देवस्थानने केला होता.
Nashik News
Nashik NewsSarkarnama

Nashik News : गेल्या काही दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. यावरुन कायदा सुव्यवस्थेचा मुद्दा ऐरणीवर आला असतानाच नाशिक येथील त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्यासाठी विशिष्ट जमाव मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एकत्र झाल्याची घटना घडल्याचं समोर आलं होतं. या कथित घटनेवरुन राजकीय आरोप प्रत्यारोपांच राजकारण चांगलंच तापलं आहे. याचवेळी आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी महत्वपूर्ण आदेश दिले आहेत.

त्र्यंबकेश्वर शहरातील (Trimbakeshwar Temple) त्र्यंबकेश्वर मंदिरात काही लोकांनी बळजबरीने प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. यानंतर देवस्थानने पोलिसांना पत्र पाठवत घटनेच्या चौकशीची मागणी केली होती. आता या घटनेची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एफआयआर नोंदवून कडक कारवाई करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. या प्रकरणी आता नाशिकमध्ये पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nashik News
Akola riots : ठाकरे गटाने घेतली मृत विलास गायकवाडच्या मुलीच्या लग्नाची जबाबदारी…

काही दिवसांपूर्वी काही अन्य धर्मियांनी नाशिक(Nashik)मधील त्र्यंबकेश्वर मंदिरात बळजबरीने शिरकाव करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देवस्थानने केला होता. तसेच इतर धर्मीय मंदिरात दर्शनासाठी जात असतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. हार-फुलं घेऊन ही मंडळी दर्शनासाठी जात असल्याचं या व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे.

दोन दिवसांपुर्वी उत्तर दरवाजाच्या ठिकाणी हा जमाव आला होता. त्यावेळी त्यांनी मंदिरात प्रवेश करण्याची मागणी केली होती. परंतू, त्यांना प्रवेश नाकारण्यात आला. देवस्थान प्रशासनाकडून त्यांची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला होता आणि त्यावेळी पोलिसांनाही पाचारण करण्यात आलं होतं.

Nashik News
Nana Patole News: ''महाडची जागा आमचीच आणि...!'' ; पटोलेंच्या दाव्यामुळे ठाकरे गटासह जगतापांची डोकेदुखी वाढली

एसआयटी स्थापन करण्याचे आदेश, मात्र...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadanvis) यांनी या घटनेची चौकशी करण्यासाठी अतिरिक्त पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली एसआयटी स्थापन करण्याचे सुद्धा आदेश दिले आहेत. ही एसआयटी केवळ यावर्षीच्या घटनेची चौकशी करणार नाही, तर गेल्या वर्षीच्या घटनेचीही चौकशी करेल, ज्यावेळी एक विशिष्ट जमाव त्र्यंबकेश्वर मंदिर परिसरात मुख्य प्रवेशद्वारातून आतमध्ये शिरल्याची कथित घटना घडली होती.

तर दुसरीकडे नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी तात्काळ घटनेसंदर्भात दोन्ही बाजूंची सलोखा बैठक घेत मुद्दा सोडविल्याचे म्हटले आहे. याचदरम्यान, पोलिसांनी मात्र, हा वाद निरर्थक असल्याचा दावा पोलिसांनी केलेला असून हा वाद गैरसमजातून झाल्याचे नाशिक (Nashik) ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमप यांनी स्पष्ट केले.

Nashik News
Karnataka Next CM : सिद्धरामय्या कर्नाटकचे पुढचे मुख्यमंत्री? : शुभेच्छा देत शिवकुमार म्हणाले ‘मी बंडखोर नाही अन्‌ ब्लॅकमेलही करत नाही’

पोलिसांकडून वाद मिटवल्याचा दावा...

पोलीस अधीक्षक शहाजी उमाप म्हणाले की, मंदिरात प्रवेश करण्याचा वाद निरर्थक असून हा वाद गैरसमजातून झाला आहे." त्र्यंबकेश्वर मंदिरात उत्तर दरवाजातून प्रवेश करण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार पोलिसात करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत सलोखा बैठक घेतली आणि वादावर पडदा टाकला आहे.

व्हिडीओ व्हायरल झाल्यानं खळबळ...

नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्यानं मोठा वादंग निर्माण झाला होता. इतरधर्मीय मंदिरात धूप दाखवण्यासाठी मंदिर परिसरात प्रवेश करण्यासाठी आग्रही होते, मात्र त्यांना सुरक्षारक्षकांनी मंदिरात प्रवेश करण्यास मज्जाव केला. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. या संदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. मंदिराच्या उत्तर दरवाजातून मंदिर परिसरात प्रवेश करुन तिथूनच देवाला धूप दाखवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानं एकच खळबळ उडाली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com