निवडणुकीवर बहिष्कार टाकलेल्या भाजप नेत्यांनी मतदान मात्र, आवर्जून केले

जळगाव बँकेसाठी ९४.८ टक्के मतदान.
निवडणुकीवर बहिष्कार टाकलेल्या भाजप नेत्यांनी मतदान मात्र, आवर्जून केले
Jalgaon District Bank Electionsarkarnama

जळगाव : जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Jalgaon District Bank Election) संचालकपदाच्या निवडणुकीत दहा जागांसाठी (आज ता. २१) ९४. ८ टक्के मतदान झाले. दोन हजार ८५३ मतदारांपैकी दोन हजार ६८४ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. मुक्ताईनगर तालुक्यात सर्वाधिक शंभर टक्के मतदान झाले. सोमवारी (ता. २२) बँकेच्या सभागृहात सकाळी आठपासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे.

बँक संचालकपदाच्या दहा जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. यासाठी जिल्ह्यातील १५ तालुक्यांत मतदान केंद्र होते. सकाळी आठपासून मतदानास प्रारंभ झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व महाविकास आघाडीच्या सहकार पॅनलचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी अकराच्या सुमारास मुक्ताईनगर केंद्रावर मतदान केले, सहकार पॅनलचे गुलाबराव देवकर यांनी जळगावात मतदान केले.

Jalgaon District Bank Election
आमदार निकम, डॉ चोरगेंच्या विजयासह रत्नागिरी जिल्हा बॅंकेवर सहकारचे वर्चस्व; बाईत पितापुत्रांचा पराभव

तालुकानिहाय झालेले मतदान

जळगाव : (४००) ३६६, भुसावळ : (१३९) १३४, यावल : ३३३ (२९५), रावेर : (३००) २८२, मुक्ताईनगर : (७६) ७६, बोदवड : (६०) ५९, जामनेर : (२०७) १८७, पाचोरा : (१८३) १७२, भडगाव : (१२८) १२७, चाळीसगाव : (१८३) १७६, पारोळा : (१९४) १८१, अमळनेर : (१८६)१७८, चोपडा : (२१६) २१४, धरणगाव : (१३८) १३३, एरंडोल : (११०) १०४.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षा ॲड. रोहिणी खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, डॉ. सतीश पाटील, भाजपचे भुसावळचे आमदार संजय सावकारे, रावेरचे माजी आमदार अरुण पाटील, अरुणा दिलीप पाटील, विकास पवार आदींच्या भाग्याचा फैसला या निवडणुकीत होणार आहे. मतदान केंद्रांच्या बाहेर नेत्यांची गर्दी दिसून आली. सहकार आघाडीचे नेते मतदान केंद्रांना भेटी देत होते. जळगाव येथील सु. ग. देवकर मतदान केंद्राच्या बाहेर सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी मंत्री डॉ. सतीश पाटील, काँग्रेसचे आमदार शिरीष चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ॲड. रवींद्र पाटील, उपाध्यक्ष वाल्मीक पाटील, शिवसेनेचे माजी आमदार चंद्रकांत सोनवणे, काँग्रेसचे महानगराध्यक्ष श्‍यामकांत तायडे, माजी महापौर ललित कोल्हे, मनोज चौधरी, शिवसेना जिल्हा महानगरप्रमुख शरद तायडे, महापालिका विरोधी पक्षनेते सुनील महाजन आदी उपस्थित होते.

Jalgaon District Bank Election
शशीकांत शिंदेंची जावळीत दादागिरी; अरेरावीला जशास तसे उत्तर देणार....

भाजप नेत्याचे मतदान

भाजपने निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता. मात्र, त्यांनी मतदानात सहभाग घेतला. भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेर येथील मतदान केंद्रावर मतदाव केले. मात्र, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांनी मतदान केले नाही, ते बाहेरगावी गेल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in