१४ दिवसांत ७ खून, महिला पोलिसावरही हल्ला!

शहरात खुनाचे सत्र सुरु असल्याने नागरिक चिंतीत.
१४ दिवसांत ७ खून, महिला पोलिसावरही हल्ला!
Murders in NashikSarkarnama

नाशिक : शहरात (Nashik) खुनाचे सत्र सुरूच असून पुन्हा एकदा गंगापूररोड पोलिस ठाणे (Police) हद्दीत आणखी एका खुनाची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. यावेळी संशयीताने महिला पोलिसावर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला. (Young men murdered in nashik with sharp weapon-sd67

Murders in Nashik
गोपीचंद पडळकरांवर गुन्हा दाखल: धनगर संघटनानीच केली तक्रार

शहरातील गंगापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाईपलाईन रोडवर एका युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. धार धार शस्त्राने वार करून या युवकाचा खून केल्याची प्रथमिक माहिती समोर आली आहे. याप्रकरणी संशयित आरोपीला महिला पोलिस कर्मचारी खैरनार यांनी अटक केली.

Murders in Nashik
सोमय्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास मी बांधील नाही !

दरम्यान, महिला पोलिस कर्मचारी सरला खैरनार यांच्यावरही वार करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळी पोलिस आयुक्तांनी भेट दिली असून शहरातील १४ दिवसात हा सातवा खून झाला आहे. शहरातील एकामागून एक खूनाच्या सत्रामुळे शहर हादरले आहे. आज झालेल्या या खुनामुळे पुन्हा एकदा नाशिकमध्ये खळबळ पसरली आहे.

...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in