Nashik Election news; मतदारसंख्येत नगर टॉपवर, नाशिक दुसरे!

विभागातील मतदारयादीत २.६२ लाख पदवीधर मतदार असलेली अंतिम यादी
Sketch of voting
Sketch of votingSarkarnama

नाशिक : नाशिक (Nashik) विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीचे मतदान येत्या ३० जानेवारीला होणार आहे. मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी (Voters list) जाहीर झाली असून विभागात २ लाख ६२ हजार ७३१ मतदार आहेत, अशी माहिती सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी (Assistant Election Officer) उपायुक्त रमेश काळे (Ramesh Kale) यांनी दिली. (Nagar District have highest voters and followed by Nashik)

Sketch of voting
Nashik Graduate Election: आचारसंहितेची कठोर अंमलबजावणी होणार!

विभागात सर्वाधिक मतदार नगर जिल्ह्यात आहेत. नगरमध्ये १ लाख १५ हजार ६३८ मतदार आहेत. नाशिक जिल्ह्यात ६९ हजार ६५२, जळगाव जिल्ह्यत ३५ हजार ५८, धुळे जिल्ह्यात २३ हजार ४१२ आणि नंदूरबार जिल्ह्यात १८ हजार ९७१ इतके मतदार आहेत. या मतदारसंख्येचा निवडणुकीचा प्रचार तसेच उमेदवारांच्या मतदानावर परिणाम होण्याची शक्यता असते.

Sketch of voting
MLA Saroj Ahire; अहीरराव भगिनीनी माझ्या विरोधात कारस्थान करू नये!

विभागात ३३८ मतदान केंद्रे

विभागातील मतदान केंद्रांचीही संख्या जाहीर करण्यात आली आहे. त्याप्रमाणे सर्वाधिक मतदान केंद्र अहमदनगर जिल्ह्यात असून, तेथील मतदान केंद्रांची संख्या १४७ इतकी आहे. नाशिकमध्ये ९९, जळगाव जिल्ह्यात ४०, धुळ्यात २९ आणि नंदूरबार जिल्ह्यात २३ मतदान केंद्रे आहेत. विभागात एकूण ३३८ मतदान केंद्रे आहेत.

मतदान येत्या 30 जानेवारी, 2023 रोजी होणार आहे. या द्विवार्षिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकरिता मतदान करताना मतदान केंद्रांवर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे मतदार ओळखपत्र (EPIC) सादर करु शकत नाहीत, अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या (EPIC) व्यतिरिक्त दहा कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य असल्याचे, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

मतदानासाठी दहा पुरावे ग्राह्य

मतदानासाठी आधार कार्ड, वाहन चालविण्याचा परवाना, पॅन कार्ड, भारतीय पारपत्र, केंद्र/राज्य शासन/सार्वजनिक उपक्रम/खाजगी औद्योगिक कंपन्यांनी वितरीत केलेले सेवा ओळखपत्र, खासदार/आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र, संबंधित पदवीधर मतदारसंघातील शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या पदवीधर मतदारांना वितरीत केलेले सेवा ओळखपत्र, विद्यापीठाद्वारे वितरित पदवी/पदवीका मुळ प्रमाणपत्र, सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले दिव्यांगत्वाचे मुळ प्रमाणपत्र अथवा भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने वितरीत केलेले युनिक डिसॅबिलीटी ओळखपत्र इत्यादी कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येतील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in