स्थानिकांसाठी २५ टक्के पाणी आरक्षीत करण्याच्या सूचना!

पालकमंत्री भुजबळ यांच्या उपस्थितीत कालवा सल्लागार समितीची बैठक
Supply minister Chhagan Bhujbal
Supply minister Chhagan BhujbalSarkarnama

नाशिक : ऊर्ध्व गोदावरी (Nashik) प्रकल्पातील गंगापूर, कडवा, पालखेड, ओझरखेड आणि चणकापूर प्रकल्पांत सिंचनाचे नियोजन करताना स्थानिकांच्या पिण्याचे पाणी (Water) आरक्षित करून नियोजन करावे, असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केले.

Supply minister Chhagan Bhujbal
कोरोनाग्रस्त असुनही मंत्री भारती पवार यांचा कोरोना रोखण्यासाठी लढा!

जिल्हाधिकारी कार्यालयात २०२१-२२ मधील सिंचन नियोजनासाठी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ते बोलत होते. कृषिमंत्री दादा भुसे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, आमदार डॉ. सुधीर तांबे, नरेंद्र दराडे, किशोर दराडे, ॲड. माणिकराव कोकाटे, दिलीप बनकर, देवयानी फरांदे, सुहास कांदे, नितीन पवार, दिलीप बोरसे, हिरामण खोसकर, सरोज अहिरे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधीक्षक अभियंता व प्रशासक अलका अहिरराव, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, राजेंद्र गोवर्धने आदी उपस्थित होते.

Supply minister Chhagan Bhujbal
देशात कुठेही झाले नाही ते नाशिककरांनी करून दाखविले!

श्री. भुजबळ म्हणाले, की मोठ्या प्रकल्पांमधील सिंचनाच्या पाण्याचे नियोजन करताना धरणसाठ्यात उपलब्ध असणाऱ्या पाणीसाठ्यानुसार स्थानिक नागरिकांना २५ टक्के पाणी आरक्षित असावे. लाभक्षेत्र विकास प्राधिकरण विभागाने शासनाकडे प्रस्ताव सादर केल्यास स्थानिक नागरिकांच्या पाणी आरक्षणाबाबतचा प्रश्‍न मार्गी लागणार असून, सर्वांना समान न्याय देता येणार आहे. याबरोबरच रब्बी हंगामाचा विचार करून ज्या भागात पाण्याची आवश्यकता जास्त आहे. त्या ठिकाणी शेतीला पाणी देण्यासाठी प्राधान्य देण्यात यावे.

रब्बीसाठी आवर्तने

गंगापूर प्रकल्पाच्या नाशिक डावा तट कालव्यातनू सिंचन व बिगर सिंचनासाठी रब्बी व उन्हाळा हंगामात प्रत्येकी तीन आवर्तने, कडवा प्रकल्पाच्या उजवा कालव्यातून सिंचन व बिगर सिंचनासाठी एक, ऊर्ध्व गोदावरी प्रकल्प पालखेड डाव्या तट कालव्यातून सिंचनासाठी रब्बी हंगामात दोन आवर्तने व बिगर सिंचनासाठी उन्हाळा हंगामात दोन आवर्तने, तसेच पालखेड उजव्या तट कालव्यातून सिंचन व बिगर सिंचनासाठी रब्बी व उन्हाळी हंगामात प्रत्येकी तीन आवर्तने सोडण्याचे नियोजन करावे. गोदावरी प्रकल्प ओझरखेड प्रकल्प यामध्ये ओझरखेड व तिसगाव कालव्यातून सिंचनासाठी रब्बी हंगामात दोन व उन्हाळा हंगामात बिगर सिंचनासाठी एक आवर्तन सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. चणकापूर प्रकल्प कालव्यातून सिंचन व बिगर सिंचनासाठी रब्बी हंगामात एक व उन्हाळा हंगामात मर्यादित क्षेत्रासाठी एक आवर्तन देण्याच्या नियोजनाच्या सूचना भुजबळ यांनी दिल्या.

----

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in