संजय राऊतांची खासदारकी घालवण्यासाठी आचार्य तुषार भोसले मैदानात!

Sanjay Raut | Press | Bjp | Tushar Bhosale : संजय राऊतांच्या भाषेविरोधात तुषार भोसले आक्रमक
Tushar Bhosale - sanjay Raut
Tushar Bhosale - sanjay RautSarkarnama

मुंबई : शिवसेना (Shivsena) नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपच्या नेत्यांविरोधात पत्रकार परिषद घेत भाजपवर अनेक आरोप केले. याच पत्रकार परिषदेत शिवसेनेने आपले सर्व नेते, उपनेते, आमदार, खासदार यांना एकत्र करत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावरुन आता भाजप-शिवसेनेमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहे. दरम्यान या पत्रकार परिषदेनंतर आता संजय राऊत यांची खासदारकी घालवण्यासाठी भाजप आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले (Tushar Bhosale) मैदानात उतरले आहेत.

माध्यमांशी बोलताना तुषार भोसले यांनी खासदार संजय राऊत यांना राज्यसभेतून तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले, उपराष्ट्रपती वेंकैय्या नायडू (Vice President Venkaiah Naidu) यांना पत्र लिहुन आपण संजय राऊत यांना राज्यसभेतून तात्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे. पत्रकार परिषदेतुन खुलेआम शिवीगाळ करणारे संजय राऊत हे साधु संतांनी घडवलेल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक आहेत. वेळोवेळी खालच्या दर्जाची भाषा वापरणाऱ्या संजय राऊतांना राज्यसभा सदस्य या संवैधानिक पदावर राहण्याचा अजिबात नैतिक अधिकार नाही, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Tushar Bhosale - sanjay Raut
१० मार्चनंतर देशाच्या राजकारणात मोठ्या घडामोडी; महाराष्ट्र करणार नेतृत्व

संजय राऊत यांनी काल मुंबईत शिवसेना भवनात आमदार-खासदारांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी अनेक गौप्यस्फोट करत भाजप नेत्यांवर टीकास्त्र सोडले. राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी आम्हाला मदत करा; अन्यथा तुम्हाला टाईट करण्यात येईल, अशी धमकी भाजप नेत्यांनी दिल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. यावेळी राऊत यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या, नील सोमय्या, मोहित कंबोज यांच्यासह माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या आरोप केले आहेत. या दरम्यान त्यांनी किरीट सोमय्यांना दलाल, भडवा अशा शिव्यांची लाखोली वाहिली.

Tushar Bhosale - sanjay Raut
कधीकाळी राज ठाकरेंसोबत बसणाऱ्या शिशिर शिंदेंवर आज शिवसेनेत दुर्देवी वेळ...

देवेंद्र फडणवीसांच्या काळातील पाच हजार कोटींच्या घोटाळ्याचा हिशोब माझ्याकडे असल्याचा आरोप संजय राऊत यांनी यावेळी केला. ते म्हणाले, आधी EOW कडे तक्रार करणार आणि नंतर हे प्रकरण ईडीकडे जाणार आहे. तसेच PMC घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवान यांच्यापासून १२ हजार कोटी रुपयांची जमीन मोहित कंबोजने १०० कोटी रुपयांत खरेदी केली आहे. त्याचबरोबर निकाॅन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कोणाची कंपनी आहे? ही सोमय्यांची कंपनी आहे. वाधवान याला ब्लॅकमेल करून सोमय्यांनी ८० ते १०० कोटी रुपयांची रोकड घेतली आणि याच वाधवानने वीस कोटी रुपये भाजपच्या अकौंटमध्ये गेले आहेत, असाही आरोप संजय राऊत यांनी यावेळी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com