आशिष शेलारांच्या जीवाला धोका?; कुटुंबासह जीवे मारण्याची धमकी

Ashish Shelar threat : मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांना पत्र लिहुन तक्रार केली
Ashish Shelar
Ashish Shelar Sarkarnama

मुंबई : भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी आल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत त्यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांना पत्र लिहुन तक्रार केली आहे. सतत दोन वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून धमकी देण्यात येत असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. याबाबत तपास करण्याची विनंतीही त्यांनी पत्रातुन केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, आशिष शेलार (Ashish Shelar) आणि त्यांच्या कुटुंबियांना सतात्याने दोन वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून धमकी देण्यात येते आहे. तसेच एक अज्ञात इसम देत असून अत्यंत अर्वाच्य भाषेत शिविगाळ करत आहे. याबाबतची तक्रार त्यांनी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे यांना पत्र लिहुन तक्रार केली आहे. या तक्रारी दरम्यान दोन्ही मोबाईल नंबरची माहिती देऊन याबाबत तपास करण्याची शेलार यांनी विनंती केली आहे.

Ashish Shelar
काळजी घ्या! राज्यात रुग्णांचा आलेख चढताच; ऑक्सिजनच्या मागणीही दिडपट वाढ

दरम्यान आशिष शेलार (Ashish Shelar) यांना यापुर्वी एकदा २०२० मध्ये अशाच प्रकारे धमकी देण्यात आली होती. त्यावेळीही त्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर धमकी देणाऱ्याला वांद्रे पोलिसांनी मुंब्रा येथून अटक केली होती. तर त्यापुर्वी अतिरेक्यांकडे आमदार आशिष शेलार यांच्यासह अन्य दोन हिंदुत्ववादी व्यक्तींची रेकी केल्याची माहिती सापली होती. दरम्यान आता पुन्हा एकदा त्यांना धमकी देण्यात आली असून याबाबत शेलार आज राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना पत्र लिहून आलेल्या धमकीची माहिती देण्यात येणार असल्याचे समजते आहे.

Ashish Shelar
दोनच वर्षात यड्रावकर विरोधकांना पुरुन उरले; आमदार, मंत्री अन् जिल्हा बँकेवरही गेले

याबाबत बोलताना विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आशिष शेलार यांना आलेली धमकी पोलिसांनी गांभीर्यांने घ्यावी असे म्हंटले आहे. नागपूरमध्ये बोलताना ते म्हणाले, आशिष शेलार हे सातत्याने सरकारविरोधात बोलत असतात. सरकारमधील भ्रष्टाचार, अनागोंदी कारभार बाहेर आणत असतात, संघर्ष करत असतात. त्यामुळे त्यांना अशी धमकी आली असावी. त्यामुळे पोलिसांनी ही धमकी गांभीर्याने घ्यावी असे मत त्यांनी व्यक्त केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com