Sadabhau Khot : ..तर पवारांचे नाव लावणार नाही, म्हणणारे अजित पवार कोण ? महाराष्ट्राला कळू द्या..

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिल्लरवाला गडी आहे, असेही ते म्हणाले. राज्याचे आरोग्य मंत्री तथा जालन्याचे पालकमंत्री यांच्यावरही खोत यांनी गंभीर आरोप केले. (Sadabhau Khot)
Sadabhau Khot-Ajit Pawar
Sadabhau Khot-Ajit PawarSarkarnama

जालना : सत्तेवर येण्याआधी निवडणुक प्रचारात अजित पवारांनी शेतकऱ्यांना वीज मोफत देऊ, असे आश्वासन दिले होते. (Jalna) मोफत वीज दिली नाही तर पवारांचे नाव सांगणार नाही, असेही भीमादेवी थाटात सांगितले होते. आता अजित पवार कोणाची औलाद आहे हे महाराष्ट्राला कळू द्या, अशा भाषेत रयत क्रांती सघटनेचे अध्यक्ष माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर टीका केली.

जालना जिल्ह्यातील वाटुर फाटा येथील शेतकरी संवाद दौऱ्यात ते बोलत होते. टीका करतांना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरल्याचे पहायला मिळाले. (Marathwada) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देखील त्यांनी चिल्लर माणूस असा उल्लेख केला. राज्यात सध्या वीजेचा प्रश्न गंभीर बनला आहे, शेतकऱ्यांची वीज तोडली जात आहे, दिली तर ती अवेळी दिली जाते, त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. यावरून विरोधक महाविकास आघाडीवर तुटून पडले आहेत.

रयत क्राती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी जालना जिल्ह्यातील आपल्या संवाद दौऱ्या दरम्यान, अजित पवारांवर टीका करतांना खालची पातळी गाठल्याचे पहायला मिळाले. शेतकऱ्यांना मोफत वीज देईन, नाहीतर पवारांचे नाव सागंणार नाही, असे म्हणणारे अजित पवार कुणाची औलाद आहेत हे एकदा महाराष्ट्राला कळू द्या, अशी टीका खोत यांनी यावेळी केली.

Sadabhau Khot-Ajit Pawar
Bjp : मध्यप्रदेश सरकारने चार महिन्यात इम्पिरिकल डेटा सादर केला, तुम्ही अडीच वर्ष काय केले ?

एवढ्यावरच ते थांबले नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चिल्लरवाला गडी आहे, असेही ते म्हणाले. राज्याचे आरोग्य मंत्री तथा जालन्याचे पालकमंत्री यांच्यावरही खोत यांनी गंभीर आरोप केले. आरोग्य विभागाच्या भरती प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करतांना आरोग्य मंत्री टोपे यांनीच दहा-पंधरा लाखांत उत्तर पत्रिका विकल्याचा खळबळजनक आरोपही केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com