पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचा उमेदवार विजयी होणारच

काँग्रेसचे विधान परिषदेचे सदस्य शरद रणपिसे यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती
Nana Patole
Nana Patole

मुंबई : विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार डॉ. प्रज्ञा राजीव सातव (Dr. Pradnya Satav) यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) प्रमुख नेतेही उपस्थित होते.

काँग्रेसचे विधान परिषदेचे सदस्य शरद रणपिसे यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती. या जागेवर होत असलेली निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी काँग्रेसची (Congress) अपेक्षा आहे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करु, मात्र निवडणूक झाली तरी काँग्रेसचा उमेदवार निश्चित विजयी होईल, असा विश्वास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी व्यक्त केला आहे.

Nana Patole
सोनिया आणि राहुल गांधींनी प्रज्ञा सातव यांना दिलेला शब्द पाळला

राजीव सातव यांच्या निधनानंतर संपुर्ण काॅंग्रेस पक्ष आणि गांधी कुटुंब सातव यांच्या कुटुंबाच्या पाठीशी भक्कपणे उभे राहील, अशी ग्वाही राहुल गांधी, प्रियंका गांधी व सोनिया गांधी यांनी दिली होती. दरम्यान, वेळोवेळी त्यांनी सातव यांच्या कुटुंबियांची चौकशी देखील केली.

राजीव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या प्रज्ञा सातव यांना उमेदवारी मिळणार अशा चर्चा होत्या. काही महिन्यांपुर्वीच महाराष्ट्राच्या प्रदेश कार्यकारणीत उपाध्यक्ष म्हणून प्रज्ञा यांची नेमणूक करण्यात आली होती. परंतु तेव्हा प्रज्ञा यांच्या ऐवजी रजनी पाटील यांना उमेदवारी देऊन त्यांना राज्यसभेवर पाठवण्यात आले.

यावर विचारले असता, पक्ष देईल ती जबाबदारी आपण पार पाडू, असे प्रज्ञा सातव यांनी स्पष्ट केले होते. अखेर राहुल गांधी यांनींही सातव कुटुंबियांना दिलेला शब्द पाळला. प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर झाल्यामुळे त्यांच्या विजय देखील निश्चित समजला जात आहे. विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्यानंतर त्या जिल्हा आणि मतदारसंघातील प्रश्न देखील सोडवू शकतील, असा त्यांच्या समर्थकांना विश्वास आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com