Narayan Rane
Narayan Ranesarkarnama

`जून महिन्यात राजकीय वादळ; ठाकरे सरकार कोसळणार!`

केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांचे भाकित खरे ठरणार का, याची उत्सुकता

वाशीम : राज्यातील आघाडी सरकार तीन फांद्याचे झाड आहे. जून महिन्यात राजकीय वादळ येवून हे आघाडी सरकार कोसळेल, असे भाकित केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केले आहे.


राणे हे वाशीम जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत महाविकास आघाडी सरकार व शिवसेनेवर निशाणा साधला. ``शिवसेनेला प्रशासन चालवता येत नाही. मुख्यमंत्री पद सांभाळणे शिवसेनेचा आवाका नाही. अडीच वर्षांत मुख्यमंत्री फक्त एकदा मंत्रालयात येतात. दोन तासांत फाईल निकाली काढल्याचे सांगतात यावरूनच त्यांचा प्रशासकीय अनुभव तोकडा आहे.

Narayan Rane
नारायण राणे पुन्हा रडारवर; बांधकामासंदर्भात १५ दिवसांचा अल्टिमेटम

राज ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्याच्या संदर्भात घेतलेल्या भूमिकेबाबत त्यांना विचारणा केली असता जे भोंगे नियमानुसार नाहीत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली. त्यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावरही टीका केला. राऊत यांना मी पत्रकार मानत नाही. त्यांची भाषा पत्रकाराला शोभेशी नाही. त्यांनी इतरांना नैतिकता शिकवू नये. मी अशा माणसाला किंमत देत नाही. त्यांनी इतकी संपत्ती कशी जमवली, याचे उत्तर आधी द्यावे. त्यांची संपत्ती जप्त झाली आहे. त्यांनी इतरांना ज्ञान शिकवू नये, असा टोला त्यांनी लगावला.

राणे यांच्या या वाशिममधील वक्तव्यानंतर संजय राऊत हे मुंबईत पत्रकारांशी बोलले. राणे यांच्या नव्या भाकिताबद्दल विचारले असता अशी अनेक वादळे परतवून लावण्याची आणि नवे वादळ निर्माण करण्याची क्षमता शिवसेनेत असल्याचा दावा त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com