Bullock Cart Race and good news for Thackeray government

Bullock Cart Race and good news for Thackeray government

Sarkarnama

रोजचा संघर्ष करणाऱ्या ठाकरे सरकारला अनेक दिवसांनी Good news

Bullock Cart Race : सत्तास्थापना ते बैलगाडा शर्यत परवानगी

नवी दिल्ली : आज राज्यातील महाविकास आघाडी सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. मागच्या १० वर्षांपासून बंदी असलेल्या बैलगाडा शर्यतीवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवली. त्यामुळे राज्यात आता पुन्हा एकदा "भिर्रर्र..." आवाज घुमणार आहे, बैलगाडा शर्यती सुरु होणार आहेत. मात्र याच आजच्या निकालामुळे सर्वोच्च न्यायालयात रोज संघर्ष करणाऱ्या ठाकरे सरकारला अनेक दिवसांनी Good news मिळाली आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. याचा प्रत्यय आजच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या या निकालानंतरच्या प्रतिक्रियेनंतरही आला.

२०१९ साली ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयात सत्ता स्थापनेच्या निकालाची पहिली Good News मिळाली होती. त्यानंतरच्या काळात मात्र ठाकरे सरकारला मराठा आरक्षण (Maratha Reservation), सुशांतसिंग राजपूत (Sushantsing Rajput Suicided) आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा प्रश्न, परीक्षांसंदर्भातील यूजीसीविरोधातली केस, परमबीर सिंग प्रकरण (Parambeer Singh Case), ओबीसी आरक्षण (OBC Reservation), निवडणूकांना स्थगिती अशा अनेक खटल्यांमध्ये धक्का बसला होता. या सर्व खटल्यांमध्ये संघर्ष करुनही त्यांचे निकाल मात्र ठाकरे सरकारच्या विरोधात गेले होते. पण आता आज बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याच्या निकालामुळे ठाकरे सरकारला अनेक दिवसांनी काही तरी चांगली बातमी मिळाली आहे.

<div class="paragraphs"><p>Bullock Cart Race and good news for Thackeray government </p></div>
अभिजीत पानसे शिवसेनेत? 'त्या' गुप्त भेटीविषयी झाला मोठा खुलासा

आजच्या निकालाकडे महाराष्ट्राचे लक्ष

सर्वोच्च न्यायालयातील आजच्या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्यासाठी याआधी लोकसभेपासून ते विधानसभेपर्यंत अनेकदा मागण्या करण्यात आल्या, ग्रामीण भागात अनेकदा आंदोलनेही करण्यात आली. राज्यातील ग्रामीण भागात बैलगाडा स्पर्धांचे आकर्षण आहे. मात्र उच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातल्यामुळे गावच्या जत्रांमध्ये कुस्ती आणि तमाशाच्या फडाबरोबर रंगणाऱ्या बैलगाड्या शर्यतीही बंद झाल्या होत्या. पण आता आजच्या निर्णयामुळे पुन्हा एकदा गावांमध्ये भिर्रर्र...आवाज घुमणार आहे.

<div class="paragraphs"><p>Bullock Cart Race and good news for Thackeray government </p></div>
शर्यतीची बारी बसली : शेतकऱ्यांची एकजूट आणि बैलगाडा मालकांचा विजय!

सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी देताना हे प्रकरण आता घटनापीठाकडे देण्यात आले आहे. या निर्णयाचे राज्यभर स्वागत केले जात असून बैलगाडा मालकांकडून आनंद साजरा केला जात आहे. शासनाच्या अटींचे पालन करून शर्यती घेतल्या जातील, असे त्यांच्याकडून सांगितले जात आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com