राणे, कदम, शिंदे चालत नाही, ठाकरेंना मराठा नेतृत्व नकोय ? रामदासभाईंचा हल्ला..

उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांना दिलेली मुलाखत म्हणजे उंदराला मांजराची साक्ष असा हा प्रकार आहे. राऊत प्रश्न विचारणार उद्धवजी त्यांना उत्तर देणार. (Ramdas kadam)
Uddhav Thackeray-Ramdas kadam
Uddhav Thackeray-Ramdas kadamSarkarnama

मुंबई : शिवसेनेतून हकालपट्टी केलेले नेते रामदास कदम यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशीच त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. शिवसेनेतून शिंदे गट बाहेर पडल्यानंतर पहिल्यांदाच कदम यांनी या बंडाला ठाकरे विरुद्ध मराठा असा रंग देण्याचा प्रयत्न केला आहे. विशेष म्हणजे रामदास कदम (Ramdas Kadam) यांचा देखील आज वाढदिवस आहे. याच दिवशी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीवर कदम यांनी तिखट प्रतिक्रिया दिली.

नारायण राणे, रामदास कदम आणि आता एकनाथ शिंदे याचा अर्थ काय समजायचा. उद्धव ठाकरे यांना मराठा नेतृत्व मोठं होऊ द्यायचं नाही का ? (Maharashtra) असा गंभीर आरोप कदमांनी केला आहे. उद्धव ठाकरे यांनी हाॅस्पीटलमध्ये अॅडमीट असतांना मला आणि माझा मुलगा योगश कदम यांना राजकारणातून संपवा, योगेशला निवडणूकीत पाडा, तिथे राष्ट्रवादीचा झेंडा फडकला तरी चालेल हे सांगण्यासाठी मिटिंग घेतली होती. माजीमंत्री उदय सामंत यांनीच आपल्याला ही माहिती दिल्याचा गौप्यस्फोट कदम यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना केला.

सुभाष देसाई, अनिल परब, मिलिंद नार्वेकर आणि आदित्य ठाकरे हे स्वतः या मिटिंगला हजर होते, मला आणि माझ्या मुलाला राजकारणातून संपवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी अॅडमीट असतांना सहा बैठका घेतल्याचा खळबळजनक आरोप करतांनाच उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांशी बेईमानी केली, शरद पवारांच्या मांडीवर बसून बाळासाहेबांच्या पाठीत खंजीर खुपसला, असा आरोपही केला.

उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या मुलाखतीत केलेले आरोप, दावे यावरून राज्याच्या राजकारणात वादळ निर्माण झाले आहे. आतापर्यंत ठाकरे यांच्याविरोधात न बोलण्याची भूमिका घेतलेले शिंदे सेनेतील सर्वच बंडखोर आमदार आता थेट उद्धव ठाकरे यांच्यावरच टीका करतांना दिसत आहेत. रामदास कदम यांनी देखील आज उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतांनाच खडेबोल सुनावले.

कदम म्हणाले, आज उद्धव ठाकरे मुलाखती देत आहेत, बैठका घेत आहेत, आदित्य ठाकरेंची शिवसंवाद यात्रा सुरू झाली आहे. मातोश्रीचे दरवाजे सगळ्यांसाठी खुले केले जात आहेत, हेच तीन वर्षापुर्वी केले असते तर आजची वेळ आली नसती. उद्धव ठाकरे यांनी संजय राऊतांना दिलेली मुलाखत म्हणजे उंदराला मांजराची साक्ष असा हा प्रकार आहे. राऊत प्रश्न विचारणार उद्धवजी त्यांना उत्तर देणार. राऊत हे शिवसेना वाचवू शकतात का ? याचा विचार उद्धव ठाकरेंनी केला पाहिजे.

Uddhav Thackeray-Ramdas kadam
खोलीत बसून मुलाखत काय देता ? मोकळ्या मैदानात या ; ठाकरेंना रावसाहेब दानवेंचे आव्हान

अजूनही हकालपट्या आणि भावनिक आवाहन करण्याचे एकमेव काम उद्धव ठाकरे करत आहेत. माझ्या खेडमधील पदाधिकाऱ्याची हकालपट्टी करण्यात आली. तुम्ही रामदास कदम, योगेश कदमला संपवत नाही आहात, तर कोकणातली शिवसेना संपवायला निघाला आहात. शिंदे आणि बंडखोर आमदारांनी शिवसेना या आपल्या आईच्या दुधाशी बेईमानी केल्याचा आरोप ठाकरेंनी आपल्या मुलाखतीत केला.

यावर पवारांच्या विचारांवर काम करणाऱ्या उद्धव ठाकरेंनी कोणाच्या दुधाशी बेईमानी केली ? असा सवाल देखील कदम यांनी केला. कदम, शिंदे, हे काल आलेले शिवसैनिक नाहीत, ही संघटना वाढवण्यासाठी रक्ताचे पाणी करणारे आम्ही लोक आहोत. अनेक शिवसैनिकांचे खून झाले, जेलमध्ये गेले, त्यांच्या संसाराची राखरांगोळी झाली, तेव्हा कुठेही शिवसेना मोठी झाली, असे सांगत कदम यांनी उद्धव ठाकरे यांना मराठा नेतृत्व मोठे होऊ द्यायचे नाही का? याचा पुनरुच्चारही केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in