Raju Shetti & Ashok Chavan Meet: आघाडीत स्वाभिमानीची 'घरवापसी'?शेट्टींसोबतच्या भेटीनंतर चव्हाणांचे मोठे संकेत म्हणाले...

Maharashtra Politics : राजू शेट्टी आघाडीच्या टाळीला टाळी देणार की एकला चलो रे चा मार्ग कायम ठेवणार ?
Raju Shetti & Ashok Chavan Meet
Raju Shetti & Ashok Chavan MeetSarkarnama

Nanded : स्वाभिमानी शेतकरी संघटना २०१९ ला राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी झाली होती. मात्र, अडीच वर्षात अनेकदा मागणी करूनही संघटनेला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून न घेतल्यानं अखेर आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं नेते राजू शेट्टी यांनी जाहीर केला होता. मात्र, आता पुन्हा एकदा शेट्टी महाविकास आघाडीसोबत सूत जुळवून घेण्याच्या तयारीत आहेत की काय अशा चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरु लागल्या आहेत.

राजू शेट्टी(Raju Shetti) यांनी आज(दि.३०) काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची नांदेड येथील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड वीस मिनिटं चर्चा झाली. मात्र,या भेटीनंतर अशोक चव्हाणांनी शेट्टींच्या स्वाभिमानी संघटनेच्या महाविकास आघाडीतील घरवापसीचे संकेत दिले आहेत. पण आता राजू शेट्टी आघाडीच्या टाळीला टाळी देणार की एकला चलो रे चा मार्ग कायम ठेवणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Raju Shetti & Ashok Chavan Meet
Mahavikas Aaghadi Rally : ''१ मे रोजी मुंबईतली 'वज्रमूठ' सभा शेवटची असेल..''; भाजपच्या 'या' नेत्याचं मोठं विधान

अशोक चव्हाण काय म्हणाले?

राजू शेट्टी आपले मित्र असून आमच्या सरकारच्या काळात त्यांचे सहकार्य लाभल्याचे अशोक चव्हाण म्हणाले. तसेच आमची वैचारिक भूमिका एकच आहे. ते आम्हाला आम्ही त्यांना सहकार्य करतो असेही ते म्हणाले. मित्र नांदेडला आल्यानं त्याचं स्वागत केलं. आगामी काळात एकत्र येऊन महाराष्ट्रात काम केलं पाहिजे अशी भूमिका मी त्यांना सांगितल्याचेही असेही अशोक चव्हाण(Ashok Chavan)यांनी यावेळी म्हणाले.

चव्हाण यांच्यासोबत 20 वर्षापासून संबंध...

आगामी काळात शेतकरी संघटनासोबत राजकीय, सामाजिक विषयावर चर्चा झाल्याचे मत राजू शेट्टींनी व्यक्त केलं. तर आज नांदेडला आलो त्यामुळं अशोक चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतली. भेटीत राजकीय, सामाजिक विषयावर चर्चा झाल्याचे राजू शेट्टी म्हणाले.

Raju Shetti & Ashok Chavan Meet
Karnataka Election : मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक पसंती कुणाला? कानडी जनतेचा कौल काय?

...म्हणून बाजार समिती निवडणुकीत राज्यात भाजपचा पराभव!

नांदेड जिल्ह्यात काँगेस आणि महाविकास आघाडी(Mahavikas Aaghadi)ला यश मिळालं असल्याची प्रतिक्रिया काँगेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली. राज्या मधल्या काळात जी राजकीय उलथापालथ झाली, ती अनैसर्गिक होती. कायद्याला धरुन नव्हती असंही चव्हाण म्हणाले. मात्र, लोकांना ते आवडलं नाही. त्यामुळं बाजार समिती निवडणुकीत राज्यात भाजपचा पराभव झाल्याचे अशोक चव्हाण म्हणाले.

शेतकरी नेत्यासोबत जुळवून घेण्याचा काँगेसचा प्रयत्न!

तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांचा बीआरएस पक्ष राज्याच्या राजकारणात उतरला आहे. राज्यांतील शेतकरी नेत्यांना पक्षात आणण्याचे प्रयत्न देखील बीआरएसकडून सुरू आहेत. त्यामुळेच राजु शेट्टी यांना देखील बीआरएसने ऑफर दिली. पण आपण त्यांची ऑफर नाकारली. संघटना सोडून आपण कोणत्याही पक्षात जाणार नाही असं राजू शेट्टी यांनी स्पष्ट केलं. मात्र, बीआरएसचं आगामी काळातील काम पाहून ठरवावे लागेल असे देखील राजु शेट्टी म्हणाले.

Raju Shetti & Ashok Chavan Meet
Nitesh Rane vs Sanjay Raut: ''2019 ला संजय राऊतांना मुख्यमंत्री व्हायचं होतं; पण ठाकरेंनी...; राणेंचा मोठा गौप्यस्फोट

मोठे चेहरे जर बीआरएस(BRS)ला मिळाले तर मतविभाजनाचा फटका महाविकास आघाडी आणि आघाडीतील घटक पक्षांना बसू शकतो. त्यामुळे शेतकरी नेत्यासोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न काँगेसकडून सुरु आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in