Sushilkumar Shinde : जनाधार नसलेल्यांना मुख्यमंत्री केले; तेच पक्षाला शहाणपण शिकवू लागलेत

Prithviraj Chavan-पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्ष नेतृत्वावर जोरदार टीका करत ‘भारत जोडो’ यात्रा आता कॉंग्रेसची राहिली नाही, असे म्हटले आहे.
SushilKumar Shinde
SushilKumar ShindeSarkarnama

नवीदिल्ली : ज्यांच्यामागे कधी फारसा जनाधार नव्हता अशांना मोठ्या राज्यांचे मुख्यमंत्री करण्यात आले. त्यांनीच काँग्रेसच्या श्रेष्ठींना आता शहाणपण शिकवावे, ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे, या शब्दात माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांचे नाव न घेता टीका केली.

SushilKumar Shinde
राज ठाकरे- एकनाथ शिंदेच्या भेटीमागे 'मिशन मुंबई?' | Shinde-thakceray visit

पृथ्वीराज चव्हाण यांनी पक्ष नेतृत्वावर जोरदार टीका करत ‘भारत जोडो’ यात्रा आता कॉंग्रेसची राहिली नाही, अशी टीका केली होती. या यात्रेत आपण सहभागी होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. काँग्रेस घटनेप्रमाणे चालत नाही. २४ वर्षापासून पक्षात कार्यकारिणीच्या लोकशाही पद्धतीने निवडणुका झाल्या नाहीत, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी माध्यमांशी बोलताना दोन दिवसांपूर्वी केला होता.

SushilKumar Shinde
Shiv Sena : शिंदे-ठाकरे गटासह राजकारणात सर्वांनाच मिलिंद नार्वेकर हवेहवेसे का वाटतात ?

गांधी कुटुंबियांनी खूप दिले असे सुनावले जाणार असेल तर तुम्ही देणारे कोण असे खडे बोल चव्हाण यांनी गांधी कुटुंबाला सुनावले होते. चव्हाण यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या वक्तव्याची दिल्लीच्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा झाली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद यांनी काँग्रेसला रामराम करीत स्वतंत्र पक्ष स्थापन केल्याने गेल्या काही दिवसात काँग्रेसमध्ये गदारोळ माजला आहे. जी-२३ गटातील अनेक नेते गुलाब नबी आझाद यांच्या भूमिकेशी सहमत आहेत. पृथ्वीराज चव्हाण हे त्यापैकीच एक असल्याने त्यांच्यावर सुशील कुमार शिंदे यांनी टीका केली आहे.

कॉंग्रेसने आयुष्यात मला खूप काही दिले. मी कॉंग्रेसचा निष्ठावंत आहे, अशी भूमिका सुशीलकुमार शिंदे यांनी मांडली. आझाद यांनी गांधी कुटुंबावर टीका करीत कॉंग्रेसला रामराम केल्याने पक्षात गेल्या आठवडाभरात गदारोळ माजला आहे. जम्मू काश्‍मीर वगळता देशातील कुणीही नेता आझाद यांच्यासोबत उघडपणे गेला नसला तरी जी-२३ मधील अनेक नेते आजही आझाद यांच्या भूमिकेशी सहमत आहेत. मात्र, यापैकी केवळ पृथ्वीराज चव्हाण यांनी उघडपणे भूमिका घेतली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in