राज्यातील 'या' तीन जिल्ह्यात कडक संचारबंदी
Curfew in some districts of Maharashtra

राज्यातील 'या' तीन जिल्ह्यात कडक संचारबंदी

गेल्या महिन्यात त्रिपुरात (Tripura) मोठा सांप्रदायिक हिंसाचार (Communal violence) झाला होता.

मुंबई : गेल्या महिन्यात त्रिपुराची (Tripura) राजधानी आगरतळा (Agartala) पासून 155 किमी अंतरावर असलेल्या पानीसागर या ठिकाणी ही मुस्लिम व्यापाऱ्यांच्या घरांची आणि दुकानांची तोडफोड करून नंतर जाळपोळ करण्यात आली. एका मशिदीचीही तोडफोड करण्यात आली, या नंतर याठिकाणी मोठा हिंसाचार घडला, अशा अनेक घटना गेल्या काही दिवसांपासून समोर आल्या.

या घटनांचे पडसाद महाराष्ट्रातही (Maharashtra) उमटले. अमरावती, नांदेड, नंदुरबार यांसह काही जिल्ह्यातही मोठ्या प्रमाणात मोर्चे काढण्यात आले. मात्र अमरावतीमध्ये गेल्या आठवड्यात मोठा हिंसाचार घडला. या हिंसाचाराच्या पार्श्वभुमीवर राज्यातील काही जिल्ह्यात संचारबंदी (curfew) लागू करण्यात आली आहे.

Curfew in some districts of Maharashtra
'चीनची पुन्हा घुसखोरी; पण केंद्रसरकार सत्य लपवतयं'

-अमरावती शहरात पुन्हा कडक संचारबंदीचे आदेश

आज होणाऱ्या भाजप व वंचितच्या राज्यव्यापी आंदोलनाचा अमरावती जिल्हा प्रशासनाने घेतला धसका घेतला आहे. यासाटी शहरात सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 5 किंवा पेक्षा जास्त नागरिक एकाच ठिकाणी दिसल्यास कारवाईचा इशारा स्थानिक प्रशासनाने दिला आहे. तीन दिवस संचारबंदीत शिथिलता देण्यात आल्यानंतर अमरावती प्रशासनाने पुन्हा नवीन नियम लागू केले आहेत. अमरावतीच्या पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी याबाबत सुधारित आदेश काढले आहेत.

- बुलढाणा जिल्ह्यात तीन दिवसासाठी संचारबंदी

बुलढाणा जिल्ह्यात 21 ते 23 तारखेदरम्यान जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. या तीन दिवसात कोणत्याही प्रकारचे आंदोलन, मोर्चे, धरणे, करता येणार नाहीत. त्याचबरोबर एकाच ठिकाणी 5 पेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यासही मज्जाव करण्यात आला आहे. हा आदेश बुलढाणा जिल्ह्यातील 13 ही तालुक्यात लागू करण्यात आला आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांनी यांनी जिल्ह्यात 144 कलम लागू करण्यात आले आहे. आदेशाचे उंल्लघन करणाऱ्यावर कठोर कारवाईचेही आदेश देण्यात आले आहे.

Curfew in some districts of Maharashtra
''यह क्या किया तुने sameer Dawood Wankhede? आज निकाल

- सोलापूर शहरात रात्री 1 वाजल्यापासून उद्या रात्री 12 वाजेपर्यंत संचारबंदी

त्रिपुरा राज्यातील घटनेच्या अनुषंगाने सोलापूर शहरात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी रात्री 1 वाजल्यापासून उद्या रात्री 12 वाजेपर्यंत कडक जमावबंदी लागू करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त हरीश बैजल यांनी हे आदेश काढले आहेत.

या कालावधी दरम्यान राजकीय, सामाजिक मिरवणूक, रॅली, धरणे, मेळावे, मोर्चे काढण्यासाठी बंदी घालण्यात आलेली आहे. या आदेशाचा उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात येणार आहे.

- नक्की काय आहे प्रकरण?

बांग्लादेशातील दुर्गापूजेदरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या निषेधार्थ त्रिपुरात विश्व हिंदू परिषदेने 26 ऑक्टोबर रोजी रॅली काढली होती. रॅलीदरम्यान काही मुस्लिम व्यापाऱ्यांच्या घरांची आणि दुकानांची तोडफोड करून नंतर जाळपोळ करण्यात आली. एका मशिदीचीही तोडफोड केल्याचा आरोप आहे.

विश्व हिंदू परिषदेच्या रॅलीमध्ये सुमारे 3,500 कार्यकर्ते सहभागी झाल्याचे स्थानिक पोलिसांचे म्हणणे आहे. हिंसाचाराच्या संदर्भात दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्रिपुरातील पाणीसागर आणि परिसरात कलम 144 लागू करण्यात आले. 26 ऑक्टोबरची घटना हा योगायोग नव्हता तर राज्यातील अनेक भागात अनेक दिवसांपासून हिंसक घटना घडत आहेत ज्यात मुस्लिमांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप तेथील स्थानिक नागरिकांनी केला आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in