Prakash Ambedkar News : न्यायालयाच्या निकालावर आंबेडकरांचं मोठं विधान;म्हणाले, '' तरीही ठाकरेंना परत आणताच.. !''

Maharashtra Poltical Crisis : भाजपनं राज्यपालांमार्फत तानाशाही केली आहे....
Uddhav Thackerey & Prakash Ambedkar
Uddhav Thackerey & Prakash AmbedkarSarkarnama

Supreme Court Final Decision : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी मार्च महिन्यात पूर्ण झाली होती. यानंतर न्यायालयाच्या निकालाकडे राज्यासह संपू्र्ण देशाचं लक्ष लागलेलं होतं. अखेर सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी आज(दि.११) निकाल दिला. यात एकनाथ शिंदे यांना दिलासा मिळाला तर उध्दव ठाकरेंना धक्का बसला आहे.

या निकालानंतर राजकीय वर्तुळातून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. याचदरम्यान, वंचित बहुज आघाडीचे नेते व अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी महत्वपूर्ण टिप्पणी केली आहे.

प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य केलं. आंबेडकर म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यावेळी आततायीपणानं निर्णय घेण्यात आला. त्याचा हा परिणाम आहे. उद्धव ठाकरे माहिती देण्यात कमी पडले. भाजपनं राज्यपालांमार्फत तानाशाही केली आहे. विधानसभेत अविश्वासाचा ठराव आणला नाही असंही प्रकाश आंबेडकर यावेळी म्हणाले.

...तरीही ठाकरेंना परत आणता आलं नसतं!

उद्धव ठाकरें(Uddhav Thackeray)नी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा न देता फ्लोअर टेस्टला सामोरे गेले असते तर पुन्हा सरकार आणता आलं असतं अशाप्रकारे महत्वाचं निरीक्षणही नोंदवलं.यावर भाष्य करताना आंबेडकर म्हणाले, तसं झालं नसतं. कोर्टाला स्वतःहून कायदे तयार करण्याचा अधिकार नाही. ते फक्त लागू करू शकतात. त्यामुळे या निर्णयाचं स्वागत करावं लागेल अशी स्पष्ट भूमिका आंबेडकर यांनी यावेळी मांडली.

भाजप(BJP)चं सरकार घटनाबाह्य आहे हे त्यांनी स्पष्ट केलं आहे. शिंदे यांनी भाजपमधून बाहेर पडावं. त्यांनी घटनाबाह्य सरकार आणलं आहे अशी टीका प्रकाश आंबेडकरांनी भाजपवर केली आहे. एकनाथ शिंदे काय करतील हा त्यांचा निर्णय आहे. बीजेपी काय करते हा निर्णय शिवसेनेच्या बाजूने लागला आहे असं प्रकाश आंबेडकरांनी यावेळी म्हटलं आहे.

नाबियाचा निर्णय त्यांनी मोठ्या घटनापीठाकडे पाठवला आहे. 142 अंतर्गत जे देण्यात येतं ते पक्षापुरतं मर्यादित राहतं. इलेक्शन कमिशनचा निर्णय लार्जर बेंचकडे दिला असता तर चांगलं झालं असतं. त्या जजमेंटमध्ये ती झलक दिसते असंही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे. तसेच महाराष्ट्राच्या अध्यक्षांना अधिकार द्यावा. त्यांनी वेळ स्पष्ट केला असता तर बरं झाल असतं, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in