खोत-पडळकरांच्या भूमिकेकडे कामगारांची पाठ, विलीनीकरणाचा लढा सुरु राहणार

विलीनीकरण होईपर्यंत लढा सुरुच राहणार असल्याचे या प्रकरणातील वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी स्पष्ट केले आहे.
खोत-पडळकरांच्या भूमिकेकडे कामगारांची पाठ, विलीनीकरणाचा लढा सुरु राहणार
Gunratan sadavarteSarkarnama

मुंबई : आझाद मैदानात सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनातून भाजपचे नेते गोपीचंद पडळकर आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी तुर्तास माघार घेतली आहे. तसेच यापुढे आंदोलन सुरु ठेवायचे की नाही याचा निर्णय कामगारांनी घ्यायाचा आहे, असे देखील सदाभाऊ खोत यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र खोत-पडळकरांच्या स्थगितीच्या या मागणीला कामगार ठुकारत असून विलीनीकरण होईपर्यंत लढा सुरुच राहणार असल्याचे या प्रकरणातील वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी स्पष्ट केले आहे.

कामगारांना संदेश देताना अॅड. सदावर्ते यांना सुरुवातीला माईकची अडचण आली होती. मात्र ते म्हणाले, माझ्या आवाजाला माईकची गरज नाही. माईकवाले निघून गेले, असे म्हणत त्यांनी सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांना टोला लगावला. तसेच सरकारने तुटपुंजी वेतनवाढ दिली पण कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीची नाही, तर विलीनीकरणाची होती आणि आहे. त्यामुळे वेतनवाढ दिली तरी विलीनीकरण होईपर्यंत लढा सुरुच राहणार असल्याचेही सदावर्ते यांनी स्पष्ट केले.

Gunratan sadavarte
ST Strike : आझाद मैदानातील आंदोलनातून सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकरांची माघार!

सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांची पत्रकार पोलीस गराड्यात अजित पवार, अनिल परब यांनी करायला लावली. यात त्यांनी सदाभाऊ स्वतःसाठी स्वतः स्थगिती देऊन टाकली. पण पडळकर-सदाभाऊ खोत यांनी आंदोलनाला दिलेल्या स्थगितीला कामगार ठुकारत आहेत. असेही अॅड. सदावर्ते यांनी स्पष्ट केले. तसेच या दोन आमदारांना या आंदोलनातून आझाद करत आहे. काही दिवस कामगारांच्या भावना म्हणून हे दोघे आझाद मैदानात बसले होते, अशी टिका त्यांनी केली.

अॅड. सदावर्ते यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही फोडाफोडीच्या राजकारणाचा आरोप केला. ते म्हणाले, शरद पवार यांनी कष्टकऱ्यांना तोडण्यासाठी, भांडण लावून तोडण्याचा प्रयत्न केला. दोन भावाभावांत भांडण लावणारे तुम्ही आहात. तुम्ही आमच्यात फूट पाडली. पण जो निर्णय झाला ती एक प्रकारे फसवणूक आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर टिका करताना सदावर्चे म्हणाले, संजय राऊत यांचे रोखठोक फक्त शिवसेनेसाठी आहे, बाकी कुठेच रोख ठोक नाही. संजय राऊत यांनी या कष्टकऱ्यांसाठी का लिहले नाही? असा सवाल त्यांनी केला.

Gunratan sadavarte
आंदोलनात जेवढं मिळतं तेवढं घ्यायचं आणि... ; पडळकरांचा सूर बदलला

Related Stories

No stories found.