एसटी संपाबाबत दोन तासात मोठी घोषणा ;  वेतनवाढीबाबत निर्णय होण्याची शक्यता
Anil Parabsarkarnama

एसटी संपाबाबत दोन तासात मोठी घोषणा ; वेतनवाढीबाबत निर्णय होण्याची शक्यता

एसटी (ST strike) कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने अनेक मुद्दे राज्य सरकार समोर मांडले. अंतरिम वेतनवाढीचा प्रस्ताव किंवा विलीनीकरण यावरील सकारात्मक चर्चा झाली.

मुंबई : गेल्या सोळा दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या (ST strike) संपावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. एसटीचे विलीनीकरण ही मुख्य मागणी कर्मचाऱ्यांची आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि कामगार संघटनांच्या अनेक बैठका झाल्या, पण यावर अद्याप तोडगा निघालेला नाही. आज परब आणि कामगारांच्या शिष्टमंडळाची बैठक झाली. यात सकारात्मक चर्चा झाली आहे. त्यामळे हा संप मिटण्याची शक्यता आहे.

कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने अनेक मुद्दे राज्य सरकार समोर मांडले. अंतरिम वेतनवाढीचा प्रस्ताव किंवा विलीनीकरण यावरील सकारात्मक चर्चा झाली. महाविकास आघाडी सरकारला एक पाऊल मागे येत मोठा निर्णय घ्यावा लागल्याचं दिसत आहे. यापूर्वी दोन दिवसात ज्या बैठकी झाल्या यात एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीबाबत महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मिळत आहे. परिवहन मंत्री अनिल परब आज संध्याकाळी सहा वाजता पत्रकार परिषद घेऊन हा निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन (ST strike) नेतृत्व कोणी करायचे याबाबतचा वादही सध्या निर्माण झाला आहे. संपाचे नेतृत्व करणाऱ्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहे. आंदोलक व संपाचे नेतृत्व करणाऱ्या पदाधिकाऱ्याचे संभाषण व्हायरल झाल्याने आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Anil Parab
एसटी संप नेतृत्वावरुन मतभेद चव्हाट्यावर ; खोत, पडळकरांना विरोध

ब्रम्हपुरी आगारातील एका आंदोलकांने संघटनेचे नेते अजय गुजर यांच्याशी फोनवरुन आंदोलनाबाबत संवाद साधला. यावेळी गुजर यांनी राजकीय नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. एसटी कर्मचाऱ्याचे आझाद मैदान येथे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात भाजपचे नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar), सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) सहभागी झाले आहेत.

पडळकर आणि खोत यांच्यासोबत आंदोलकांची बैठक सुरु आहे, याबाबत विचारले असता अजय गुजर म्हणाले, ''या बैठकीचा आपला काहीही संबध नाही, आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी त्यांनी बैठक घेतली आहे. आपला लढा हा सुरु आहे. संप मिटला असे कुणीही सांगितलं यावर विश्वास ठेवू नका, जोपर्यंत मी आणि सदावर्ते सांगत नाही. तोपर्यंत हा लढा सुरुच राहिल,''

पडळकर, खोत राज्य सरकारशी चर्चेला गेल्याने अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि अजय गुजर चिडले असल्याची माहिती सूञांची दिली. अजय गुजर आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte) विलीनीकरणाच्या मागणीवर अजूनही ठाम आहेत.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in