ST संपाबाबत आज तोडगा निघणार ; अंतरिम वेतनवाढीबाबत निर्णय
St BusSarkarnama

ST संपाबाबत आज तोडगा निघणार ; अंतरिम वेतनवाढीबाबत निर्णय

'राज्य सरकारनं नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीनं इतर संघटनांच्या प्रतिनिधींचंही म्हणणं ऐकून २० डिसेंबर रोजी प्राथमिक अहवाल द्यावा,' अशा सूचना न्यायालयानं दिल्या.

मुंबई : एसटीचा संप (ST strike) वीस दिवसापासून सुरु आहे, राज्य सरकार एसटी संघटनांशी चर्चा करुन तो मिटवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. पण एसटी कर्मचारी आपल्या मागण्यावर ठाम आहे. 'हा संप कधी मिटेल,' अशी विचारणा सामान्य प्रवाशी करीत आहेत. राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करावे, ही प्रमुख मागणी कर्मचाऱ्यांची आहे.

या बाबत नेमलेल्या समितीच्या अहवाल वाट पाहावी, अशा सूचना राज्य सरकराने दिल्या आहेत. दरम्यान मंगळवारी २० डिसेंबरपर्यंत प्राथमिक अहवाल सादर करण्याच्या सूचना न्यायालयाने दिले आहे. 'राज्य सरकारनं नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीनं इतर संघटनांच्या प्रतिनिधींचंही म्हणणं ऐकून २० डिसेंबर रोजी प्राथमिक अहवाल द्यावा,' अशा सूचना न्यायालयानं दिल्या.

एसटी महामंडळाच्या विलीनीकरणासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल येईपर्यंत एसटी कामगारांना अंतरिम वेतनवाढ देण्याचा पर्याय देण्यात आला आहे. बुधवारी (ता. २४) अकरा वाजता पुन्हा एकदा बैठक घेऊन त्यावर निर्णय घेण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी दिली आहे. त्यामुळे एस टी संपावर तोडगा निघण्याची आशा निर्माण झाली आहे.

St Bus
CBIची माहिती ; नरेंद्र गिरींनी'त्या' कथित व्हिडिओमुळेच केली आत्महत्या

आमदार गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत आणि एसटीचे प्रतिनिधी यांच्यात मंगळवारी बैठक झाली. कोर्टाने विलीनीकरणाचा विचार करण्यासाठी समिती नेमली आहे. समितीचा जो काही अहवाल येईल तो आम्ही मान्य करू. पण तोपर्यंत संप चालू राहू शकत नाही. त्यामुळे कामगारांना अंतरिम वाढ देण्याचा पर्याय दिला आहे. याबाबत आजची बैठक बोलावण्यात आली आहे.

अध्यादेश काढावा

''सरकार ने यापूर्वीही आम्हाला पगारवाढ, भत्तेवाढीचे आश्वासन दिले होते पण ते कधीच पाळले नाही. अशात राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याची तयारी सरकारने दाखवली तरीही ती केवळ 2 ते 3 महिनेच हा पगार मिळेल ही भीती कर्मचाऱ्यांमध्ये आहे. सरकारने यासाठी अध्यादेश काढावा नाही तर विलीनीकरण करावे, अशी मागणी एस. टी. कामगार आंदोलक करत आहेत. एस टी कर्मचाऱ्यांचे शिष्टमंडळ राज्यसरकरच्या भेटीला जाणार आहे. त्यांना ही आम्ही हीच भूमिका मांडायला सांगणार असल्याचे मत एस टी कामगार आंदोलकांचे आहे.

खासगीकरणाच्या दिशेने पावले

एसटी महामंडळाचे खासगीकरण होणार नाही, असा दावा करण्यात येत असला तरी प्रत्यक्षात खासगीकरणाच्या दिशेने पावले टाकली जात असल्याचे दिसून येत आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू होऊन राज्यभरातील बससेवा ठप्प झाली असतानाच विद्युत बस भाडेतत्त्वाने घेण्यासाठी हैदराबादस्थित कंपनीला महामंडळाने ९ नोव्हेंबरला 'वर्क ऑर्डर' दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांचे हाल

'एसटी संप सुरू असल्यानं ग्रामीण भागातील विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. विद्यार्थ्यांना कोरोनाच्या संकटामुळं आधीच दीड वर्षापासून प्रभावी शिक्षणापासून वंचित राहावं लागलं आहे, त्यांचं आणखी नुकसान होता कामा नये. त्यामुळं उपलब्ध मनुष्यबळाच्या आधारे एसटी बससेवा सुरू राहायला हवी, असं मत खंडपीठानं व्यक्त केलं.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in