एसटी संप नेतृत्वावरुन मतभेद चव्हाट्यावर ; खोत, पडळकरांना विरोध

''आपला लढा हा सुरु आहे. संप (ST strike) मिटला असे कुणीही सांगितलं यावर विश्वास ठेवू नका, जोपर्यंत मी आणि सदावर्ते सांगत नाही. तोपर्यंत हा लढा सुरुच राहिल''
 Sadabhau Khot,Gopichand Padalkar
Sadabhau Khot,Gopichand Padalkarsarkarnama

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन (ST strike) नेतृत्व कोणी करायचे याबाबतचे वाद निर्माण झाला आहे. संपाचे नेतृत्व करणाऱ्यांमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहे. आंदोलक व संपाचे नेतृत्व करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे संभाषण व्हायरल झाल्याने आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ब्रम्हपुरी आगारातील एका आंदोलकांने संघटनेचे नेते अजय गुजर यांच्याशी फोनवरुन आंदोलनाबाबत संवाद साधला. यावेळी गुजर यांनी राजकीय नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. एसटी कर्मचाऱ्याचे आझाद मैदान येथे आंदोलन सुरु आहे. या आंदोलनात भाजपचे नेते गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar), सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) सहभागी झाले आहेत.

पडळकर आणि खोत यांच्यासोबत आंदोलकांची बैठक सुरु आहे, याबाबत विचारले असता अजय गुजर म्हणाले, ''या बैठकीचा आपला काहीही संबध नाही, आपली राजकीय पोळी भाजून घेण्यासाठी त्यांनी बैठक घेतली आहे. आपला लढा हा सुरु आहे. संप मिटला असे कुणीही सांगितलं यावर विश्वास ठेवू नका, जोपर्यंत मी आणि सदावर्ते सांगत नाही. तोपर्यंत हा लढा सुरुच राहिल,''

 Sadabhau Khot,Gopichand Padalkar
ST strike: आमच्या नावानं पावत्या कोण फाडतयं!

आंदोलनकर्त्यांसोबत चर्चा केल्यानंतरच याबाबत निर्णय घेऊ.पडळकर, खोत राज्य सरकारशी चर्चेला गेल्याने अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि अजय गुजर चिडले असल्याची माहिती सूञांची दिली. अजय गुजर आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunaratna Sadavarte) विलीनीकरणाच्या मागणीवर अजूनही ठाम आहेत.

आज आंदोलनातून बाहेर पडणाऱ्या भाजपचे नेते गोपीचंद पडळकर, सदाभाऊ खोत यांना आंदोलकांनी रोखलं. ''आंदोलन रबरासारख असतं, जास्त ताणल्यानं तुटतं,'' असं सूचक व्यक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलं आहे.

एस टी कामगारांची भूमिका घेऊन सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर यांच्यासह एस टी कामगार शिष्टमंडळ हे राज्य सरकारशी चर्चा करण्यास जाणार होते. पण त्यांना कर्मचाऱ्यांनी रोखलं. ''आमच्या आंदोलनाचे नेतृत्व तुम्हीच करा,'' असे या कर्मचाऱ्यांनी सांगितलं यावेळी आंदोलकांना गोपीचंद पडळकर म्हणाले, ''आम्ही लबाडी करत नाहीत. आंदोलन सुरू ठेवणार असाल तर त्यांच्या सोबत तुम्ही जा. सरकार बरोबर चर्चा केली नाही तर तोडगा कसा निघेल. तुम्ही राज्यात आंदोलन करणाऱ्या तुमच्या कर्मचाऱ्यांशी बोला. आम्ही लोकप्रतिनिधी आहोत आमची तुमच्यावर जबरदस्ती नाही,''

सदाभाऊ खोत म्हणाले की, विलीनीकरण हा आपला मुद्दा आहे. तुमचा माझ्यावर व पडळकरांवर विश्वास आहे ना. आंदोलन सुरू ठेवायचे असेल तर तुम्ही सुरू ठेवा. तुम्ही सांगाल तसा निर्णय घेऊ. आम्ही येथे बसतो तुम्ही जा चर्चेला जा. आमच्यावर गैरसमज दाखवत असाल तर आम्ही चर्चेत राहणार नाही. गुजर कोण आहे तो पावती फाडून पैसे गोळा करून गेला. तुमचं आंदोलन चालू ठेवायचे असेल तर तुम्ही चालू ठेवा. जे कोणी विलीकरणाचा लढा पूढे घेऊन आंदोलन करणार असतील त्यांच्या सोबत तुम्ही जा. तुम्ही आंदोलन सुरूच ठेवणार असाल तर आम्ही चर्चेला जाणार नाहीत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com