NCBच्या चैाकशीला आर्यन गैरहजर ; समीर खान यांचा पण जबाब नोंदविणार

एनसीबीच्या (NCB) एसआयटीने (SIT) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (aryan khan)याला रविवारी समन्स बजावले होते. पण आर्यन यावेळी उपस्थित राहू शकला नाही.
 aryan khan, sanjay singh
aryan khan, sanjay singhsarkarnama

मुंबई : मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात शनिवारी दिल्लीहून एनसीबीचे विशेष पथक मुंबईत पोहचले आहे. एनसीबीच्या (NCB) एसआयटीने (SIT) अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान (aryan khan)याला रविवारी समन्स बजावले होते. पण आर्यन यावेळी उपस्थित राहू शकला नाही. त्याला ताप असल्यामुळे तो एनसीबीच्या चैाकशीला उपस्थित राहू शकला नसल्याचे समजते. आर्यन सोमवारी उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे.

आर्यन खानसह एकूण सहा प्रकरणाचा तपास अमली पदार्थ विरोधी पथकाचे (ncb) मुंबई विभागाचे संचालक समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्याकडून काढून तो दिल्ली एनसीबीच्या टीमकडे सोपविण्यात आला आहे. त्याचे नेतृत्व संजय सिंह (sanjay singh) हे करणार आहेत. ते शनिवारी दिल्ली येथून मुंबईत दाखल झाले आहेत. एनसीबीचे एसआयटी टीम या प्रकरणातील आरोपीचा जबाब नोंदवित आहेत.

 aryan khan, sanjay singh
'ललित'मध्ये शराब आणि नवाब असायचे ; राम कदमांचा टोला

आर्यन खान, अरबाज खान यांचा जबाब नोंदविण्यात येणार आहे. राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांचे जावाई समीर खान यांचीही चैाकशी होणार असल्याची शक्यता आहे. याबाबतचे वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. समीर खान यांना एनसीबीनं जानेवारी महिन्यात अटक केली होती. त्यांना जामीन मिळाला आहे. शनिवारी आर्यनला समन्स बजावण्यात आले होते.

मुंबईत अमली पदार्थ बाळगणाऱ्यांविरोधात एनसीबीच्या (NCB) कारवाया आणि काही अधिकाऱ्यांविरोधात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असताना अल्पसंख्यांक खात्याचे मंत्री नवाब मलिक यांची कन्या निलोफर मलिक-खान (Nilopher Malik Khan) हिने सोशल मीडियावर लिहिलेल्या खुल्या पत्राची शनिवारी चर्चा होती.

निलोफर हिचे पती समीर खान (Sameer Khan) यांना एनसीबीने अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी जानेवारीत अटक केली होती. सप्टेंबर महिन्यात त्यांची जामिनावर सुटका झाली. जामीन देताना कोर्टाने खान यांच्याकडे सापडलेला पदार्थ हा गांजा नसून हर्बल तंबाखू असल्याचे निरिक्षण नोंदवले होते. त्या पार्श्वभूमीवर पतीच्या अटकेनंतर निलोफर यांनी त्यांच्यावर ओढवलेल्या प्रसंगाचा भावनीक तपशील या पत्रातून मांडला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com