ST संपात फूट! गुजरांना डावलून काही कर्मचारी गुणरत्न सदावर्तेंसोबत

ST Strike : अजय गुजर (Ajay Gujar) यांनी एसटी कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यात आला असल्याची घोषणा केली आहे.
Gunaratna Sadavarte on ST Strike

Gunaratna Sadavarte on ST Strike

Sarkarnama

मुंबई : मागच्या ५४ दिवसांपासून सुरु असलेला ST महामंडळाचा (ST Strike) संप मागे घेण्यात आला असल्याची घोषणा महाराष्ट्र राज्य कनिष्ठ वेतनश्रेणी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर (Ajay Gujar) यांनी केली आहे. आज परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब (Anil Parab), महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने आणि अजय गुजर यांच्यात आज तब्बल ५ तास बैठक झाली. यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेवून याबाबत ही घोषणा केली आहे. याच संघटनेच्या नोटीसीनंतर हा संप सुरु झाला होता.

मात्र आता गुजर यांना डावलून आझाद मैदानातील काही कर्मचाऱ्यांनी आपण अॅड. गुणरत्न सदावर्ते (Adv. Gunratne Sadavarte) यांच्यासोबत असल्याचे सांगितले आहे. या कर्मचाऱ्यांचा संप मागे घेण्यास विरोध असून ते आझाद मैदानात आंदोलनावर ठाम आहेत. त्यामुळे एसटी संपात आता फूट पडली असल्याचे समोर आले आहे. तर गुजर यांनी मात्र आपल्यात आणि सदावर्ते यांच्यात कोणतेही मतभेद नसून आपली आणि त्यांची भूमिका एकच असल्याचे पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.

<div class="paragraphs"><p>Gunaratna Sadavarte on&nbsp;ST Strike</p></div>
मोठी बातमी : एसटीचा संप मागे, संघटना-सरकारमध्ये बैठक यशस्वी

या पत्रकार परिषदेत बोलताना अजय गुजर आणि परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले, आज आमच्यात मॅरेथॉन बैठक झाली. यात महामंडळाचे शासनात विलिनीकरण करण्याचा मुद्दा मुंबई उच्च न्यायालयाने नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीसमोर आहे. यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने गठीत केलेल्या समितीचा जो काही निर्णय येईल तो दोन्ही पक्षांना मान्य असणार आहे.

तसेच जवळचे कर्मचारी २२ डिसेंबर आणि लांबचे कर्मचारी २३ डिसेंबरपर्यंत कामावर परतल्यानंतर त्यांच्या विरुध्दच्या निलंबन, बडतर्फी व बदल्या यासारख्या कारवाया मागे घेण्यात येतील. फौजदारी कारवाईची प्रकरणे कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करुन मागे घेण्यात येईल, असा तोडगा काढण्यात आला आहे.

<div class="paragraphs"><p>Gunaratna Sadavarte on&nbsp;ST Strike</p></div>
बसमधून 'टू व्हिलर'वर : गोव्यात कॉंग्रेस पक्ष असा झाला रिकामा!

अनिल परब बोलताना म्हणाले, चर्चेच्या दरम्यान आपल्या उर्वरित मागण्यांपैकी आर्थिक मागण्यांवर चर्चा करण्यात आली आहे. त्यानुसार महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनाप्रमाणे वेतन देण्याच्या मागणीबाबत कर्मचाऱ्यांशी चर्चा करुन निर्णय घेण्यात येईल. महामंडळाच्या कर्मचान्यांच्या वेतनाची हमी सरकारने घेतली आहे. तसेच मेडिक्लेम, विमा यावरही कर्मचाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे ठरविण्यात आले आहे. आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्यांची प्रकरणे तपासून पात्र मृत कर्मचान्यांच्या वारसांना नोकरी देण्याची मागणी विचारपुर्वक मान्य केली जाईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in