कुंटेंच्या मुदतवाढीला अजून मंजूरी नाही; तर महासंचालक पदासाठी पांडे अपात्र

ठाकरे सरकारला जेष्ठ अधिकाऱ्यांच्या नेमणूकीची चिंता...
कुंटेंच्या मुदतवाढीला अजून मंजूरी नाही; तर महासंचालक पदासाठी पांडे अपात्र
Sitaram Kunte, Sanjay Pandeysarkarnama

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना मुदतवाढ देण्याच्या प्रस्तावाला अद्याप केंद्र सरकारने मंजुरी दिलेली नाही. ते येत्या महिनाअखेरीस निवृत्त होत आहेत. मुख्य सचिवांच्या मुदतवाढीचा विषय हा केंद्र सरकारच्या अखत्यारित असल्याने आता या प्रस्तावाला मंजूरी मिळण्याची प्रतिक्षा करणे सुरु आहे. कुंटे यांची प्रतिमा लक्षात घेता त्यांना ३ महिने मुदतवाढ मिळू शकेल असे मानले जाते. मात्र त्यांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव नाकारला गेला तर ठाकरे सरकारला वेगळ्या नावाचा विचार करावा लागणार आहे. अशात मनुकुमार श्रीवास्तव, मनोज सौनिक, सुजाता सौनिक यांचे नाव समोर येते आहे.

 Sitaram Kunte, Sanjay Pandey
निलेश साबळेंनी नारायण राणेंची मागितली पाया पडून माफी

विद्यमान ज्येष्ठता यादीनुसार वंदना कृष्णा, शामलाल गोयल आणि देवाशीष चक्रवर्ती या सनदी अधिकाऱ्यांची नावे समोर येत आहेत. मात्र हे तिन्ही जेष्ठ अधिकारी फेब्रुवारीमध्ये निवृत्त होत आहेत. मुख्य सचिव म्हणून नेमणूक करताना किमान १ वर्षाची सेवा शिल्लक असावी असे संकेत आहेत. त्यामुळे कुंटे यांना ३ महिने मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव केंद्राने मान्य केल्यास हे तिन्ही अधिकारी निवृत्त होतील. त्यानंतर मनुकुमार श्रीवास्तव आणि सौनिक पतीपत्नींपैकी कोणाच्या नावावर विचार करायचा याबाबतचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे घेतील.

 Sitaram Kunte, Sanjay Pandey
संजय पांडेंचा पत्ता कट! महासंचालकपदासाठी तीन पोलीस अधिकारी शर्यतीत

पोलिस अधिकाऱ्यांच्या नेमणूकीबाबतही विचार करावा लागणार

दूसरीकडे महाराष्ट्राचे हंगामी पोलीस महासंचालक (DGP) संजय पांडे (Sanjay Pandey) या पदासाठी पात्र नसल्याची शिफारस केंद्रीय लोकसेवा आयोगाने केली आहेलोकसेवा आयोगाने महासंचालक पदासाठी रजनीश सेठ, डॉ.व्यंकटेशन आणि हेमंत नगराळे या तीन अधिकाऱ्यांची शिफारस केली आहे. या तीनपैकी एका अधिकाऱ्यांची महासंचालकपदी निवड करणे बंधनकारक असते. त्यामुळे संजय पांडे पदावरुन पायउतार होण्याचे संकेत मिळत आहे. मात्र या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील, असे गृहविभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in