Sitaram Kunte
Sitaram KunteSarkarnama

सीताराम कुंटे ED कार्यालायात : तिसऱ्या समन्सनंतर अखेर झाले हजर

अनिल देशमुख (Anil Deshmukh) गृहमंत्री असताना सीताराम कुंटे (Sitaram Kunte) गृह विभागात अतिरिक्त मुख्य सचिव

मुंबई : मुख्यमंत्र्याचे प्रधान सल्लागार आणि राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे (Sitaram Kunte) ईडी कार्यालयात हजर झाले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या १०० कोटी वसुलीच्या आरोपांप्रकरणी ईडीला त्यांची चौकशी करायची होती. याबाबत कुंटे यांना ईडीकडून समन्सही बजावण्यात आले होते. अनिल देशमुख गृहमंत्री असताना सीताराम कुंटे गृह विभागात अतिरिक्त मुख्य सचिव पदावर कार्यरत होते. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये त्यांची राज्याचे मुख्य सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

कुंटे यांना यापुर्वी ईडीकडून तीन समन्स बजावण्यात आले होते. मात्र त्यावेळी प्रशासकीय काम आणि मंत्रिमंडळाच्या बैठका-दौरे यामुळे त्यांनी ईडीकडे वेळ मागून घेतला होता. त्यानंतर कुंटे आता चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सल्लागारांचीच चौकशी होणार असल्याने राज्यात उलट-सुलट चर्चा सुरु आहे.

Sitaram Kunte
दिलीप वळसे पाटलांची बाजी : जिल्हा बँकेत पहिले मंत्री बिनविरोध

फोन टॅपिंग प्रकरणातही चौकशी

परमबीरसिंग यांनी देशमुखांवर केलेल्या खंडणीच्या आरोपानंतर गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन प्रमुख रश्मी शुक्ला यांच्या फोन टॅपिंगचे प्रकरण बाहेर आले. शुक्ला यांनी पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांबाबतचा धक्कादायक अहवाल दिला होता. यामध्ये अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आणि त्यांच्या पोस्टींगसाठी मध्यस्थांमार्फत लाचेचा मुद्दा समोर आला. त्यामुळे राज्यभर वादळ उठले.

Sitaram Kunte
ST Strike : कामावर परतलेल्या कर्मचाऱ्यांना आज पगार; संपकऱ्यांवर 'मेस्मा'ची कारवाई?

फोन टॅपिंग प्रकरणात कुंटे यांनी राज्य सरकारला अहवालही सादर केला आहे. यामध्ये त्यांनी शुक्ला यांनी केलेल्या दाव्यानुसार संबंधित काळात कोणत्याही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या नसल्याचे म्हटले आहे. शुक्ला यांनी फोन टॅपिंगची परवानगी घेतली त्यावेळी कुंटे हे गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव होते. त्यांनी परवानगी दिल्याचा दावा शुक्ला यांनी केला होता. पण परवानगी घेताना शुल्का त्यावेळी खोटे बोलल्याचा दावा करण्यात आला आहे. या प्रकरणाची ईडीकडूनही चौकशी सुरू आहे. त्यामुळे ईडीने कुंटे यांना चौकशीसाठी बोलावले असल्याचे समजते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com