काँग्रेस, शिवसेनेसाठी आजचा दिवस खूषीचा... पण राष्ट्रवादीसाठी ताणाचा!

आज मध्यरात्रीपासूनच घडलेल्या घडामोडी, आणि पोटनिवडणूकीचे लागलेले निकाल यासाठी कारणीभूत ठरले आहेत
Mahavikas Aaghadi
Mahavikas AaghadiSarkarnama

मुंबई : राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडीतील तीन पक्ष. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस. मात्र या तिघांसाठी आजचा दिवस काहीसा वेगळा आहे. यातील काँग्रेस, शिवसेनेला आजचा दिवस काहीसा खूषीचा आहे, तर राष्ट्रवादीसाठी मात्र आजचा दिवस ताणाचा ठरला आहे. त्याचे कारण म्हणजे आज मध्यरात्रीपासूनच घडलेल्या घडामोडी, आणि पोटनिवडणूकीचे लागलेले निकाल.

एकीकडे दादरा-नगर हवेली केंद्रशासित प्रदेशामधील (Dadra Nagar Haveli Union Territory) पोटनिवडणूकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर या जवळपास ५१ हजार मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांच्या रुपाने शिवसेनेला महाराष्ट्राबाहेर आपला पहिला खासदार मिळाला आहे. या विजयामुळे शिवसेनेला राज्याबाहेर विस्तारण्यास मदत होणार आहे.

Mahavikas Aaghadi
शिवसेनेला महाराष्ट्राबाहेर मिळाला पहिला खासदार; कलाबेन डेलकर विजयी

त्याचवेळी काँग्रेसनेही महाराष्ट्रातील देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघातील जागा राखली आहे. या ठिकाणच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे जितेश जिंतापूरकर हे विजयी झाले आहेत. त्यांनी जवळपास ४० हजारहुन अधिक मतांची आघाडी घेतली आहे. त्याचसोबत जितेश अंतापूरकर यांना विजयी करत जनतेने खऱ्या अर्थाने स्व. रावसाहेब अंतापूरकर यांना या निमित्ताने श्रद्धांजली वाहिली असल्याची भावना व्यक्त होत आहे.

Mahavikas Aaghadi
अशोक चव्हाणांनी देगलूर-बिलोलीकरांना हात जोडले, अन् मतदारांनीही विश्वास दाखवला

दूसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukhh) यांना सक्तवसुली संचालनालयाने (ED) अटक केली आहे. काल सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास अचानक ईडी कार्यालयात हजर झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी तब्बल १३ तास त्यांची मॅरेथॉन चौकशी केली. त्यानंतर अखेर मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास देशमुख यांना अटक करण्यात आली. मागच्या अनेक दिवसांपासून ते ईडीसमोर हजर होण्यासाठी टाळाटाळ करत होते. ईडीने अनेक वेळा समन्स दिल्यानंतरही चौकशीसाठी हजर राहत नव्हते. परंतु काल सकाळी अचानक ते ईडी कार्यालयात हजर झाले.

Mahavikas Aaghadi
ED चा दिवाळीतच धमाका : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अटक

त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निकटवर्तींयावर मागील 19 दिवसांपासून प्राप्तिकर विभाग (IT) आणि सक्त वसुली संचालनालयाचे (ED) छापे सुरू आहेत. या प्रकरणी हजारो कोटींची मालमत्ता प्राप्तिकर विभागाने जप्त केल्याची माहिती भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दिली आहे. त्यांच्या दाव्यानुसार अजित पवार यांच्याशी निगडित मालमत्तांवर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे. यात जरंडेश्वर शुगर फॅक्टरी 600 कोटी रुपये, दिल्लीतील घर 20 कोटी रुपये, पार्थ पवार यांचे नरिमन पॉईंट येथील कार्यालय 25 कोटी रुपये, गोवा येथील रिसॉर्ट 250 कोटी रुपये या मालमत्ता जप्त करण्याचे आदेश प्राप्तिकर विभागाच्या अधिकार्‍यांनी दिले आहेत.

Mahavikas Aaghadi
हजारो कोटींच्या मालमत्तांवर 'प्राप्तिकर'ची टाच अन् सोमय्यांकडून यादीच जाहीर

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com