नव्या जबाबदारीनंतर मिलिंद नार्वेकरांनी मानले मुख्यमंत्र्यांचे आभार

मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (Y S Jaganmohan Reddy) यांची मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी भेट घेतली. तिरुमला तिरुपती देवस्थान (Tirumala Tirupati Devasthan Trust) बोर्डावर सदस्य म्हणून नियुक्ती केल्याबद्दल नार्वेकर यांनी जगनमोहन रेड्डी यांचे आभार मानले आहेत.
Milind Narvekar, Y S Jaganmohan Reddy
Milind Narvekar, Y S Jaganmohan Reddysarkarnama

मुंबई : तिरुमला तिरूपती ट्रस्टच्या सदस्यपदी नेमणूक होण्यासाठी देशभरातून अनेक जण इच्छुक असतात, यासाठी मोठी चढाओढ असते. अनेक राज्याचे मुख्यमंत्री हे आंधप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधून प्रयत्न करीत असतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे नेते मिलिंद नार्वेकरांच्या यांच्या नावाची शिफारस मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (Jagmohan Reddy) यांच्याकडे केली. त्यानंतर नार्वेकर यांची या सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तिरूपती देवस्थान ट्रस्टने नव्या सदस्यांच्या नावांची यादी नुकतीच जाहीर केली आहे.

आंध्र प्रदेशचे (Andhra Pradesh) मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (Y S Jaganmohan Reddy) यांची शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी काल भेट घेतली. यावेळी नार्वेकर यांच्यासोबत त्यांचा परिवार, आणि पक्षाचे सचिव सुरज चव्हाण उपस्थित होते. तिरुमला तिरुपती देवस्थान (Tirumala Tirupati Devasthan Trust) बोर्डावर सदस्य म्हणून नियुक्ती केल्याबद्दल नार्वेकर यांनी जगनमोहन रेड्डी यांचे आभार मानले आहेत.

Milind Narvekar, Y S Jaganmohan Reddy
मलिकांनी NCB वर आरोप करून ड्रग्ज माफीयांची तळी उचलली आहे का ?

प्रसिद्ध देवस्थान तिरुमला तिरूपती ट्रस्टच्या सदस्यपदी मुख्यमंत्र्याचे निकटवर्तीय, शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांची वर्णी लागली आहे. देशभरातून २४ जणांची तिरुमला तिरूपती ट्रस्टच्या सदस्यपदी नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्रातून या यादीत शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांना स्थान मिळाले आहे. देशातील सर्वाधिक लोकप्रिय आणि श्रीमंत असलेल्या तिरुमला तिरूपती देवस्थान ट्रस्टच्या सदस्यांची यादी आंध्रप्रदेश सरकारने जाहीर केली होती.

नार्वेकरांना मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) पीए (स्वीय सहाय्यक) म्हणून ओळखलं जातं. कोकणातील दापोलीत, समुद्रकिनारी असलेला मिलिंद नार्वेकरांचा बंगला जमीनदोस्त करण्यात आला आहे. नियमांचं उल्लंघन करून, अवैधरित्या हा बंगला बांधल्याचा आरोप भाजपने केला होता. त्यामुळे गेल्याकाही दिवसांपासून मिलिंद नार्वेकर चर्चेत आहेत. मिलिंद नार्वेकर काही वर्षांपूर्वी मातोश्रीवर शाखाप्रमुख पदाच्या मुलाखतीसाठी गेले होते. त्यावेळेस उद्धव ठाकरे यांची नजर मिलिंद नार्वेकरांवर गेली. मिलिंद नार्वेकर यांच्यातील हुशारी, संवाद कौशल्य या गुणांमुळे मिलिंद नार्वेकरांची उद्धव ठाकरेंच्या पीए म्हणून निवड झाली. तेव्हापासून ते आजतायागत नार्वेकर हे अनेक जबाबदाऱ्या उत्तमरित्या पार पाडत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com