पर्रिकरांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी, शिवसेना सर्वतोपरी मदत करणार!

पर्रीकरांनी स्वंतत्रपणे निवडणूक लढवावी, शिवसेनेसह अन्य राजकीय पक्षांनी त्यांना पाठिंबा द्यावा, हीच खरी मनोहर पर्रीकरांना श्रद्धांजली ठरेल,'' असे संजय राऊत म्हणाले.
Sanjay Raut, Utpal Parrikar
Sanjay Raut, Utpal Parrikarsarkarnama

मुंबई : गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांचे चिंरजीव उत्पल पर्रिकर हे भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढविण्यास इच्छुक आहेत, पण भाजपने त्यांना उमेदवारी देण्यास नकार दिला आहे. पर्रिकरांना उमेदवारी देण्यासाठी शिवसेना, आप यांनी तयारी दर्शविली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

''उत्पल पर्रिकर (Utpal Parrikar) यांनीही राजकीय रिंगणात उतरून आपली ताकद दाखवावी. त्यांना शिवसेना सर्वतोपरी मदत करणार,'' असे आश्वासन संजय राऊत यांनी आज दिले. ते माध्यमांशी बोलत होते. उप्पल पर्रीकरांनी स्वंतत्रपणे निवडणूक लढवावी, शिवसेनेसह अन्य राजकीय पक्षांनी त्यांना पाठिंबा द्यावा, त्यांच्याविरोधात उमेदवार उभा करु नये, हीच खरी मनोहर पर्रिकरांना श्रद्धांजली ठरेल,'' असे संजय राऊत म्हणाले.

''उत्पल पर्रिकरांना भाजप तिकीट देणार नसेल, तर त्यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवावी, सर्व पक्षांनी त्यांच्यापाठीमागे उभं राहावं,'' असे राऊत यांनी यावेळी सांगितलं. उत्तरप्रदेशात विजयाचा दावा करणाऱ्या भाजपचा राऊतांनी यावेळी चांगलाच समाचार घेतला.

''मनोहर पर्रिकर हे गोव्यातील प्रमुख नेते होते. त्यांचा गोव्यात प्रभाव होता. गोव्यात भारतीय जनता पक्षाचं संघटनं वाढवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. त्यांनी गोव्याला नवीन दिशा देण्याचं काम केलं. त्यांच्या मृत्युनंतर त्यांचा मुलगा उत्पल पर्रिकर यांनी राजकारणात येण्याच इच्छा व्यक्त केली. परंतु, त्यावेळी त्यांना ज्या पद्धतीनं अपमानित करण्यात आलं, हे गोव्यातील जनतेला आवडलं नाही. परंतु, उत्पल यांनीच निर्णय घेण्याची गरज आहे. ते नक्की निवडणून येतील. त्यांना गोव्याची जनता पाठिंबा देईल. तसेच उत्पल पर्रिकर यांना शिवसेना सर्वतोपरी मदत करणार,'' असं आश्वासनही राऊतांनी दिलं.

Sanjay Raut, Utpal Parrikar
विकासकामांवरुन मुंडे बहीण-भावात शाब्दीक युद्ध सुरुच

''शिवसेना यंदा गोव्यात निवडणूक लढवणार आहे. शिवसेना पंधरा जागेवर निवडणूक लढवणार आहेत. गोव्यातील काँग्रेस वेगळ्या लाटेवर आहे. त्यामुळं कोणाबरोबर युती नाही आणि शक्यताही नाही. जे येतील त्यांच्यासह अन्यथा त्यांच्याशिवाय निवडणूक लढू,'' असं संजय राऊत यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com