ठाकरेंच्या जिवावर काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीची चैन सुरूय : शिवसेनेची जळजळीत टीका

कोल्हापूर जिल्हा बॅंकेतील राजकारणाचे महाविकास आघाडीत पडसाद
ठाकरेंच्या जिवावर काॅंग्रेस आणि राष्ट्रवादीची चैन सुरूय : शिवसेनेची जळजळीत टीका

Satej Patil-Hasan Mushrif

Sarkarnama

कोल्हापूर : राज्यात ठाकरेंचे सरकार आणि कोल्हापूरात (Kolhapur) कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या चैन्या सुरु आहेत. शिवसेनेच्या जीवावर आमदार, खासदार आणि मंत्री झाले आणि आत्ता शिवसेनेला सोडून विरोधकांसोबत जावून कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची (Kolhapur DCC) निवडणूक लढवणाऱ्यांना लाज वाटल पाहिजे, अशी जळजळीत टिका शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी केली. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी (केडीसीसी) बॅंकेच्या निवडणूकीनिमित्त शिवसेनेच्यावतीने जिल्हाध्यक्ष (Kolhapur Shivsena) संजय पवार यांनी शासकीय

विश्रामगृहात पदाधिकारी, उमेदवार व कार्यकर्त्यांची आढावा बैठक़ घेतली. यावेळी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सर्जेराव पाटील, माजी आमदार विनायक साळुंखे, सहकार शहराध्यक्ष आकाराम पाटील उपस्थित होते.

Satej Patil-Hasan Mushrif

ओमिक्राॅनमुळे महापालिका, ZP निवडणुका पुढे जाणार... साथ रोग कायद्याचा आधार घेणार

शिवसेना जिल्हाध्यक्ष संजय पवार म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आहे. हाच फॉर्म्युला जिल्हा बॅंकेत राहिले असे पहिल्यापासून सांगितले जात होते. पण, प्रत्यक्षात कॉंग्रेस-राष्ट्रवादीने शिवसेनेला सोडून भाजपशी मिळते जुळते घेवून शिवसेनेला धोका दिला आहे. जिल्हा बॅंकेत किती आणि कोणती जागा असावी हे ठरविण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे. मातोश्रीवरूनच याची घोषणा होईल. पण शिवसेनेचे उमेदवार कॉंग्रेस-राष्ट्रवादीचेचे नेते ठरवत असतील हे चालणार नाही. वास्तविक त्यांना शिवसेनेला नव्हे तर भाजपला सोबत घ्यायचे होते. यात शिवसेनेतून खासदार झालेल्यांच्या मातोश्री आणि आमच्या भगिनी माजी खासदार निवेदिता माने ही मागचा सर्व इतिहास विसरून त्यांनी भाजपसोबत गेलेल्या कॉंग्रेस,राष्ट्रवादीची सोबत दिली हे चुकीचे आहे.``

Satej Patil-Hasan Mushrif

अवैध धंद्यावरुन महाविकास आघाडीत वाद; शिवसेना-राष्ट्रवादी आमनेसामने

ज्यावेळी त्यांच्याकडे काही नव्हते त्यावेळी शिवसेनेने त्यांना मिळवून दिले, हे त्या सोयीस्कररित्या विसरल्या आहेत. त्यामुळे आता स्वार्थी नेते विरूध्द स्वाभिमानी शिवसेना कार्यकर्ते अशा लढाई सुरु झाली आहे. शिवसेनेच्या महिला आघाडीनेही या निवडणूकीत पुढाकार घेतला पाहिजे. यामध्ये निश्‍चितपणे आपला विजय होणार यात शंका नसल्याचा विश्‍वासही श्री पवार यांनी व्यक्त केला.

जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सर्जेराव पाटील म्हणाले, ``राज्यात सरकार ठाकरेंचे आणि जिल्ह्यात कॉंग्रेस - राष्ट्रवादीवाल्यांच्या चैन्या सुरु आहेत. जिल्ह्यात शिवसेनेला काना, विलांटी पुरतेचे वापरले जात आहे. आपल्या पक्षातून ज्यांची आमदार, खासदार म्हणून वर्णी लागल्यानंतर ते पक्षाकडे पाहत नाहीत. जिल्हा बॅंकेच्या निवडणूकीचे नियोजन आठ दिवसात करु चालणार नाही. त्याचे सहा महिन्याआधीच नियोजन झाल ेपाहिजे होते. आता मोर्चा आणि आंदोलन करुन चालणार नाही. तांत्रिक बाबींवर काम केले पाहिजे.

Satej Patil-Hasan Mushrif

हसन मुश्रीफ यांनी त्या लढतीसाठी तीन वर्षे तयारी केली... पण

आकाराम पाटील म्हणाले, जिल्हा बॅंकेसाठी शहरातील पेठांमध्ये असणाऱ्या मतदारांपर्यंत पोचले पाहिजे. ज्या-ज्या ठिकाणी पेठ आहे. त्या-त्या ठिकाणी शिवसेनेची शाखा आहे. या शाखेतील प्रत्येक पदाधिकाऱ्याने मतदारांपर्यंत पोचले पाहिजे. त्या शिवसेनेची भूमिका सांगितली पाहिजे. राज्यात ठाकरे सरकार आहे. जिल्हा बॅंकेसाठी त्याचा चांगला उपयोग करता येईल. हे ही पटवून दिले पाहिजे.

शिवसेना जिल्हा संघटक संजय जाधव म्हणाले, ``महाविकास आघाडी म्हणून आम्ही गाफिल राहिलो. सहकारमध्ये आम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे. पण आम्हाला बाळासाहेब ठाकरे यांनी रडायला नाही तर लढायला शिकवले आहे. त्यानूसार जिल्हा बॅंकेची निवडणूक ताकदीने लढणार आहे. यावेळी, संजय पाटील, चंद्रकांत पाटील, तानाजी आंग्रे, संभाजी पाटील, संदिप कारंडे, मंजित माने, सुरेश पोवार, जीवन पाटील, इंद्रजित पाटील, सतीश कुरणे, बाजीराव पाटील, राजेंद्र पाटील, शुभांगी पवार, स्मिता सावंत, विराज पाटील, कृष्णात पोवार, प्रशांत पावोर सरदार पोवार उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.