"आताही अंध भक्त बोलतील, काय हा साहेबांचा मास्टर स्ट्रोक"; शिवसेनेचा टोला

अहंकार पराभूत झाला, पण आताही अंध भक्त बोलतील, 'काय हा साहेबांचा मास्टर स्ट्रोक!", अशा शब्दात शिवसेनेनं (shivsena) भाजपला (BJP) फटकारलं आहे.
"आताही अंध भक्त बोलतील, काय हा साहेबांचा मास्टर स्ट्रोक"; शिवसेनेचा टोला
Sanjay Raut,Narendra ModiSarkarnama

पुणे : शेतकऱ्यांचा विरोध असलेले तीन कृषी कायदे (Agriculture Act) शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी मागे घेण्याचा निर्णय घेतला. मोदींच्या या निर्णयावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. मोदींच्या या निर्णयावर शिवसेनेचे (shivsena) मुखपत्र असलेल्या 'सामना'तून टीकेचे बाण सोडण्यात आले आहे.

"लोकशाही आंदोलनातून जे साध्य होऊ शकले नाही ते आगामी निवडणुकांच्या भीतीने साध्य झाले असे काँगेस नेते पी. चिदंबरम यांनी म्हटले आहे. 'महाभारत' आणि 'रामायणा'त शेवटी अहंकाराचाच पराभव झाला हे सध्याचे नकली हिंदुत्ववादी विसरले व त्यांनी रावणाप्रमाणे सत्य व न्यायावरच हल्ला केला. शेतकरी लढत राहिले, शहीद झाले व शेवटी जिंकले. 13 राज्यांतील पोटनिवडणुकांत भाजपाला पराभव स्वीकारावा लागला. त्यातून आलेले हे शहाणपण आहे," असा टोला अग्रलेखात मोदींना लगावला आहे.

"लखीमपूर खिरी येथे आंदोलक शेतकऱ्यांना भाजपाच्या मंत्रिपुत्राने चिरडून मारले. त्या 'जालियनवाला बाग'सारख्या हत्याकांडाविरुद्ध सार्वत्रिक बंद पुकारणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य होते. न्याय, सत्य आणि राष्ट्रवादाच्या लढाईत महाराष्ट्राने नेहमीच निर्भय भूमिका घेतली. यापुढेही अशी भूमिका घ्यावीच लागेल. तिन्ही कृषी कायदे मागे घेणे अखेर केंद्र सरकारला भाग पडले आहे. शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय झालाच आहे. मागे हटणार नाही असे सांगणाऱ्यांचा अहंकार पराभूत झाला, पण आताही अंध भक्त बोलतील, 'काय हा साहेबांचा मास्टर स्ट्रोक!", अशा शब्दात शिवसेनेनं (shivsena) भाजपला (BJP) फटकारलं आहे.

Sanjay Raut,Narendra Modi
आमदारकीची हळद लावून बसलोय, पण तो बाबा लग्न लावून द्यायला तयार नाही!

"शेतकऱ्यांच्या एकजुटीचा हा विजय आहे. देशात मनमानी चालणार नाही, 'हम करेसो कायदा' हे तर त्याहून चालणार नाही. प्रत्येक चुकीच्या आणि दडपशाहीच्या विरोधात जनतेला एकजुटीने उभे राहावं लागेल. पंतप्रधान मोदी यांनी संसद अधिवेशनाच्या आधी तिन्ही कृषी कायदे मागे घेतल्याची घोषणा केली. प्रयत्न करूनही आम्ही काही शेतकऱ्यांना त्यांच्या हिताबाबत स्पष्टीकरण देऊ शकलो नाही," असे अग्रलेखात म्हटलं आहे.

'सामना'ने अग्रलेखात काय म्हटलंय?

  • पंतप्रधान मोदींनी आंदोलनाकडे त्यांनी संपूर्ण दुर्लक्ष केले. त्या शेतकऱयांचे वीज, पाणी बंद केले. दहशत निर्माण करण्यासाठी गुंडांच्या टोळ्या पाठवल्या. तरीही शेतकरी जागचे हटले नाहीत.

  • काळे कायदे व शेतकऱ्यांचे हक्क चिरडणारे म्हणून या तीन कृषी कायद्यांची बदनामी झाली होती.

  • शेतजमिनी, कृषी उत्पन्न बाजार समित्या खासगी भांडवलदारांच्या घशात घालणाऱ्या या कायद्यांना शेतकऱ्यांनी जोरदार विरोध केला.

  • शेतकऱ्यांना खलिस्तानवादी, पाकिस्तानवादी, दहशतवादी ठरवून बदनाम केले. लखीमपूर खिरी येथे केंद्रीय मंत्रिपुत्राने आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांना चिरडून मारले.

  • 'शेतकरी मरू द्या, आजन्म आंदोलन करू द्या, पण सरकार एक पाऊलही मागे हटणार नाही,' या आडमुठेपणाचा त्याग करून सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतले आहेत.

  • उत्तर प्रदेश, पंजाब विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव होईल या भीतीने मोदी सरकारने आता कृषी कायदे मागे घेतले."

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in