शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जुंपली ; एकनाथ शिंदेंनी सुनावलं

''बापाची चप्पल मुलाने घातली तर तो बाप होत नाही, त्यांनी निदान तसं वागायला पाहिजे''
शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये जुंपली ; एकनाथ शिंदेंनी सुनावलं
Ekanath Shindesarkarnama

ठाणे : ''आनंद परांजपे यांचे वडिल प्रकाश परांजपे यांना शिवसेनेने जो मानसन्मान दिला त्यामुळे त्यांची चप्पल घालून त्याने काम करायला पाहिजे होते, मात्र त्यांना ते जमले नाही,बापाची चप्पल मुलाने घातली तर तो बाप होत नाही, त्यांनी निदान तसं वागायला पाहिजे,'' अशा शब्दात शिवनेतेचे नेते, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे ( Anand Paranjape) यांना सुनावलं.

एकनाथ शिंदे एका कार्यक्रमासाठी मनमाड येथे आले होते. यावेळी त्यांनी परांजपे यांच्यावर हल्लाबोल केला. ठाण्यातील कळवा येथे खारेगाव उड्डाणपुल लोकार्पण सोहळा नुकताच झाला. यावेळी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये चांगलेच शाब्दीक युद्ध रंगले.

लोकार्पणाआधीच शिवसेनेने उड्डाणपुलावर “सततच्या पाठपुराव्याला यश” अशी बॅनरबाजी करत सर्वत्र भगवे झेंडे लावले होते. हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिव्हारी लागले. त्यांच्या कार्यकर्त्यांनी लगेचच सर्वत्र राष्ट्रवादीचे झेंडे आणि बॅनर लावले ज्यावर “वचनपूर्ती” असं लिहिलं गेलं जे शिवसेनेच्या जिव्हारी लागलं.

पत्रकार परिषद घेऊन 'या उड्डाणपुलाला आनंद परांजपे यांनी मंजुरी मिळवली, मध्ये वेळ का लागला तेव्हा त्याचाही लोकांनी विचार करावा, कसं आहे ना आम्ही बापाच्या भूमिकेत आहोत. ते तरुण रक्त आहे सळसळत रक्त आहे परिपक्वता आली पाहिजे” अशी टीका जितेंद्र आव्हाड यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर केली होती. आव्हाड यांनी 'महाविकास आघाडीचेच सर्व आहेत हे सांगताना खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव घेता परिपक्वता आली पाहिजे कोणी काय केले हे कळव्याच्या जनतेला माहितीये' अशा शब्दांत पलटवार केला.

Ekanath Shinde
भाजपला जोरदार धक्का : अनेक शिलेदारांचा गडाखांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश

एकनाथ शिंदे म्हणाले, ''महाविकास सरकारचे काम व्यवस्थितीत सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारला दोन वर्ष पूर्ण झाले आहे. कोरोनाचे संकट हे अचानकपणे राज्यावर आले. या काळात मुख्यमंत्र्यांनी उत्तमपणे नियोजन करून परिस्थिती हाताळली. पहिल्या लाटेत आणि दुसऱ्या लाटेत तारेवर कसरत करावी लागली. न्यायालयानेही राज्य सरकारचे कौतुक केले आहे. या काळात सरकारने कोणत्याही विकासकामाला ब्रेक लागू दिला नाही. मुळात भाजपच्या नेत्यांना सरकार स्थापन झाल्यापासून पचनी पडत नाही, त्यामुळे त्यांचे नको ते उद्योग सुरू आहे,"

विकासासाठी राजकारण करा ; मुंडे बहीण-भावांत त शाब्दीक युद्ध सुरुच

बीड : काही दिवसापूर्वी बीड (beed) जिल्ह्यातील एका अधिकाऱ्याने रिव्हाल्वर द्यावी, अशी मागणी केली आहे. यावरुन भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादीचे नेते (ncp), सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (dhanjay munde) यांच्यावर निशाणा साधला आहे. या विषयावरुन धनंजय मुंडे- पंकजा मुंडे यांच्यात शाब्दीक युद्ध रंगले आहे. परळी मतदारसंघात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत विविध गावांतील महत्वाच्या सुमारे 62 कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या कामांचे रविवारी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमीपूजन झाले. त्यावेळी धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.