शिवसेनेला खिंडार ; ४० पदाधिकाऱ्यांचा सेनेला 'जय महाराष्ट्र'

वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर (hitendra thakur) यांच्या उपस्थित या ४० पदाधिकाऱ्यांनी बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला.
शिवसेनेला खिंडार ; ४० पदाधिकाऱ्यांचा सेनेला 'जय महाराष्ट्र'

मुंबई : मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षानी जोरदार तयारी केली आहे. फोडाफोडीचे राजकारण सुरु झाले आहे. शिवसेनेत (shivsena) गळपेची होत असल्याचा आरोप करीत अनेकांनी शिवसेनेला 'जय महाराष्ट्र' करीत दुसऱ्या पक्षात प्रवेश केला आहे. असाच एक धक्का विरारमध्ये शिवसेनेला बसला आहे.

विरार शिवसेना शहर समन्वयक वैभव विलास पांडे यांच्यासह सुमारे सुमारे ४० पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेला रामराम ठोकत बहुजन विकास आघाडीत प्रवेश केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर (hitendra thakur) यांच्या उपस्थित या ४० पदाधिकाऱ्यांनी बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला.

शिवसेनेतून बहुजन विकास आघाडीमध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये शिवसेना विरार शहर समन्वयक व माजी शहर प्रमुख वैभव विलास पांडे, ग्लोबल सिटी विभाग प्रमुख दर्शन मोहिते, तिरुपती विभाग प्रमुख हर्षद जानवलकर, डोंगरपाडा विभाग संघटीका रेणुका पांडे, उपविभागप्रमुख पारितोष पाटील, मेहुल वझे, शाखाप्रमुख अक्षय तेली, शत्रुघ्न जयस्वाल, उपशाखाप्रमुख प्रवीण केंद्रे या प्रमुख नेते उपस्थित होते. तसेच महिला आघाडी शाखासंघटक अंजली सरवणकर, पूजा जयस्वाल, उपशाखासंघटक माधुरी कौशिक, दुर्वा मोहिते आदी शिवसैनिकांनी बहुजन विकास आघाडीत प्रवेश केला.

शिवसेनेला खिंडार ; ४० पदाधिकाऱ्यांचा सेनेला 'जय महाराष्ट्र'
एसटी संपाबाबत राज ठाकरे मुख्यमंत्र्यांना लिहिणार पत्र

सतत जुन्या जाणत्या व ज्यांनी खडतर काळापासून शिवसेना जनसामान्यात रुजवली, वाढवली. मतदारांपर्यंत व घराघरात भगवा पोचवून हक्काचा मतदार तयार केला. त्यांनाच सतत डावलले जात असल्याची नाराजी कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. शिवसेनेत गळचेपी होत असल्याचा आरोप पक्ष सोडणाऱ्यांनी केला आहे.

पक्षप्रवेश सोहळ्यात बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव अजीव पाटील, माजी नगरसेवक हार्दिक राऊत, माजी सभापती सखाराम महाडिक, माजी नगरसेवक प्रशांत राऊत, नेते विलासबंधू चोरघे, प्रफुल साने, आनंद पाटील, जयेश ठक्कर उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com