Maharashtra News : महाराष्ट्रासाठी १८ सप्टेंबर महत्त्वाचा दिवस; तीन मोठ्या निर्णयांची शक्यता !

Two big decisions For Maharashtra : सुप्रीम कोर्ट काय टिप्पणी करणार?
Uddhav Thackeray : Eknath Shinde
Uddhav Thackeray : Eknath ShindeSarkarnama

Delhi News : संसदेचे पाचदिवसीय विशेष अधिवेशन १८ सप्टेंबरपासून सुरू होणार असल्याने, याकडे सर्वांचे लक्ष याकडे लागले आहे. त्यासोबतच सोमवारी सुप्रीम कोर्टात महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाच्या दोन याचिकांवर सुनावणी होण्याची शक्यता असल्याने या घडामोडींकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. त्यामुळे दिल्लीत १८ सप्टेंबरला घडत असलेल्या या तीन महत्त्वाच्या घडामोडींकडे राज्यातील सरकारचे भवितव्य अवलंबून असणार असल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे. (Latest Marathi News)

Uddhav Thackeray : Eknath Shinde
Dharashiv Political News : ठाकरे गटाच्या ओमराजेंविरोधात 'धाराशिव'मध्ये भाजपच्या इच्छुकांची रांगच रांग ; पुन्हा राणा जगजीतसिंह की...?

दिल्लीत १८ सप्टेंबरपासून पाच दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. त्यामध्ये नेमके काय निर्णय होणार याकडे लक्ष लागले आहे. या अधिवेशनात काहीतरी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच हा दिवस महाराष्ट्राच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण असणार आहे. १८ सप्टेंबर रोजी सुप्रीम कोर्टात शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून १६ आमदार अपात्रतेवर निर्णय घेण्यास विधानसभा अध्यक्षाकडून विलंब लावला जात असल्याने, याचिका दाखल करण्यात आली आहे. या संदर्भातील याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Uddhav Thackeray : Eknath Shinde
NCP Crisis News : अजित पवारांची बैठकीला दांडी; शरद पवार यांच्यापुढे येणे जाणीवपूर्वक टाळले ?

शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून शिवसेने पक्षासंदर्भात निवडणूक आयोगाने घेतलेल्या निर्णयावर आक्षेप घेणारी याचिकाही दाखल केली आहे. ही सुनावणी सोमवारी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या दोन्ही याचिकेवर सुनावणी झाल्या तर यावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेणार? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे.

दरम्यान, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आमदार अपात्रतेसंदर्भात निर्णय घेण्यासाठी नुकतीच दोन्ही गटाच्या आमदारांची सुनावणी घेतली आहे. त्यांना पुढची तारीख दिली गेली आहे.त्यामुळे महाराष्ट्राच्या दृष्टीने १८ सप्टेंबर हा दिवस महत्वपूर्ण ठरण्याची शक्यता असल्याने, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यावर सुप्रीम कोर्ट काय टिप्पणी करणार याकडे लक्ष असणार आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in