सरपंच अन् प्रांताधिकाऱ्यांना बेईमानी महागात! ५.५० लाखांची लाच स्वीकारताना अटक

prasenjit pradhan and sandeep davar
prasenjit pradhan and sandeep davar sarkarnama

कोल्हापूर : स्टोन क्रशर व्यावसायिकाकडून ५.५० लाखांची लाच स्वीकारताना राधानगरीचे प्रांताधिकारी प्रसेनजित बबनराव प्रधान (वय : ४०) आणि फराळे ग्रामपंचायतीचे सरपंच संदीप जयवंत डवर (वय : ४२) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. आज (रविवार) दुपारी पोलीस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या नेतृत्वातील पथकाने ही कारवाई केली असून प्रांताधिकारी प्रधान आणि सरपंच संदीप डवर यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रांताधिकाऱ्यांसारखे उच्च दर्जाचे अधिकारीच लाच घेताना सापडल्याने राज्यातील महसूल विभागात आणि कोल्हापूर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार स्टोन क्रशर उद्योजक यांचा फराळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत स्टोन क्रशरचा व्यवसाय आहे. मात्र या स्टोन क्रशरवर येणाऱ्या अवजड वाहनांमुळे परिसरातील सर्व रस्ते खराब झाल्याचा ग्रामस्थांचा दावा आहे. शिवाय मोठ-मोठ आवाजामुळे काही घरांच्या भिंतीना तडे गेले असल्याचे देखील ग्रामस्थांचे म्हणणे होते. ग्रामस्थांच्या याच तक्रारीनंतर सरपंच संदीप डवर यांनी ग्रामपंचायतीच्या वतीने तक्रारदार व्यावसायिकास यांना आपला क्रशर का बंद करण्यात येऊ नये? अशी कारणे दाखवा नोटीस बजावली होती.

यानंतर सरपंचांच्या नोटिशीच्या राधानगरी प्रांताधिकारीऱ्यांनीही स्टोन क्रशर व्यावसायिकास आणखी एक कारणे दाखवा नोटीस बजावली. मात्र हि कारवाई टाळण्याची विनंती करत स्टोन क्रशर व्यावसायिकाने सरपंच संदीप डवर आणि प्रांताधिकारी प्रसेनजित प्रधान यांची समक्ष भेट घेतली. या विनंतीवर सरपंच डवर यांनी ही कारवाई टाळण्यासाठी प्रांताधिकारी प्रधान यांच्यासाठी १० लाख रुपये आणि स्वतःसाठी दरमहा १ लाख रुपये खंडणी देण्याची मागणी केली.

या मागणीनंतर व्यावसायिकाने आज सकाळी प्रांताधिकाऱ्यांच्या घरी जात सरपंचांनी आपल्यासाठी १० लाख रुपयांची मागणी केली असल्याचे सांगितले. त्यावर प्रांताधिकार्‍यांनी संमती दर्शवून ते पैसे आजच्या आज सरपंचांकडे सुपूर्द करण्यास सांगितले. त्यानंतर आज दुपारी हे पैसे स्वीकारण्यासाठी सरपंच डवर प्रांताधिकारी कार्यालय जवळ आले होते. त्यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक पथकाचे पोलिस उपाधीक्षक आदिनाथ बुधवंत आणि त्यांच्या पथकाने सापळा रचत प्रांताधिकारींसाठी ५ लाख आणि स्वतःसाठी ५० हजार रुपये स्वीकारताना सरपंच डवर यांना रंगेहात पकडले. त्यानंतर तातडीने प्रांताधिकारी कार्यालयात जाऊन प्रांताधिकारी प्रसेनजित प्रधान यांनाही ताब्यात घेतले. विषेश म्हणजे आज रविवार सुट्टीचा दिवस असतानाही प्रांताधिकारी आपल्या कार्यालयात आले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com