Satyajeet Tambe : एच. के. पाटलांचे नाव घेत सत्याजीत तांबेंचे नाना पटोलेंवर गंभीर आरोप

Maharashtra Congess : उमेदवारीवरून प्रदेश काँग्रेसकडून टाकलेल्या डावांचा सांगितला घटनाक्रम
Satyajeet Tambe, Nana Patole
Satyajeet Tambe, Nana PatoleSarkarnama

Maharashtra Congress News : विधानपरिषदेच्या (MLC Election) नाशिक पदवीधर निवडणूक सत्यजीत तांबे मोठ्या फरकाने विजयी झाले. तत्पूर्वी या मतदार संघात झालेलं राजकीय नाट्य देशभर गाजलं. निवडून आल्यानंतर तांबे कोणाचे, यावरही चर्चा सुरू झाल्या.

त्यावर अखेर सत्यजीत तांबे यांनी पडदा टाकत प्रदेश काँग्रेसकडून मला, माझ्या परिवाराला काँग्रेसच्या बाहेर ढकलण्याचा स्क्रिप्टेड प्रयत्न झाल्याचा खळबळजनक आरोप केला. यावेळी त्यांनी वारंवार एच. के. पाटील यांचं नाव घेत अप्रत्यक्षरित्या काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर निशाना साधला. यावेळी नेमकं काय घडलं याचा संपूर्ण घटनाक्रमच त्यांनी उलगडा.

यावेळी सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) म्हणाले की, तांबे परिवार काँग्रेसशी एकनिष्ठ आहेत. दरम्यान पुस्तक प्रकाशनावेळी सर्व पक्षातील मान्यवरांना निमंत्रित केलं होतं. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट केलेल्या वक्तव्यामुळं राज्य काँग्रेसमध्ये काय चाललंय याची प्रचिती राज्यालाही आल्यांचं तांबे यांनी सांगितलं.

Satyajeet Tambe, Nana Patole
Ashwini Jagtap : अश्विनी जगतापांच्या उमेदवारीमुळं भाजपमध्ये हुरूप; तर राष्ट्रवादीचं वाढलं टेन्शन

पुढे तांबे म्हणाले, "त्यानंतर लगेचच विधानपरिषदेची निवडणूक लागली. त्यावेळी पक्षाकडून मला वडिलांच्या जागेवरून लढण्यास सांगण्यात आलं. त्यास मी विरोध दर्शविला होता. मात्र, पक्ष त्या विचारापुढं जायला तयार नव्हता. पक्ष, संघटना मागे उभी राहत नसेल तर दुसरा पर्याय नसल्याचं वडील म्हणाले. त्यानंतर वडिलांनी पुढाकार घेत मला त्यांच्या जागेवरून लढण्यास सांगितलं."

घरात झालेल्या चर्चेनंतर माझ्या उमेदवारीबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठींना कळविला. तसेच एच. के. पाटील यांना उमेदवार न ठरविण्याबाबत विनंती केली. निवडणुकीपूर्वी दोन-तीन दिवस आधी एच. के. पाटील (H. K. Patil) यांच्याशी चर्चा झाली. त्यावेळी त्यांनी कोरा एबी फॉर्म पाठवू असं सांगितलं. त्यानुसार ९ जानेवारी रोजी फॉर्मसाठी संपर्क साधला. त्यावेळी १० जानेवारी रोजी फॉर्म देऊ असं सांगितलं.

त्यानुसार आमचा माणूस तेथे गेला. त्याला दहा तास बसवून ठेवलं. त्यानंतर पटोले यांनी फॉर्म दिला. तसेच फॉर्म देत असल्याचं त्यांनी फोन करूनही माहिती दिली. तो सीलबंद होता. ११ जानेवारी रोजी सकाळी फॉर्म मिळाला. त्यावेळी पाकिट फोडलं असता समजलं की ते नागपूर आणि औरंगबादचे फॉर्म होते, असं म्हणत त्यांनी ते फॉर्म प्रसारमाध्यमांसमोर दाखवले. यावरुन त्यांनी पटोले यांचे नाव न घेता आरोप केले.

Satyajeet Tambe, Nana Patole
Satyajeet Tambe : मला आणि बाळासाहेब थोरातांना पक्षातून हकलण्याचं षडयंत्र :तांबेंचा घणाघाती आरोप!

एबी फॉर्मसारखा संवेदनशील विषयाबाबत पक्षश्रेष्ठी कसे चुकू शकतात, असा प्रश्न उपस्थित करून मला, माझ्या कुटुंबास भाजपमध्ये ढकलण्याचा हा 'स्क्रिप्टेड' हेतू असल्याचा आरोप सत्यजीत तांबे यांनी नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर केला केला आहे. तसेच फॉर्म चुकीचे असल्याचं वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर दुसरा डाव टाकण्याचा प्रयत्न केला. दुसऱ्या वेळी १२ जानेवारी रोजी दुसरा फॉर्म पाठविला. त्या फॉर्ममध्ये पर्यायी उमेदावाराच्या रकान्यात 'नील' असा शेरा होता, असं म्हणत त्यांनी तो फॉर्मही यावेळी दाखविला.

Satyajeet Tambe, Nana Patole
Kasba by-election : कसब्यात हेमंत रासनेंना उमेदवारी; ब्राम्हण समाजाच्या नाराजीचा भाजपला फटका बसणार का?

दरम्यान, कोणाचीही उमेदावीर दिल्लीतून झाली नसताना डॉ. सुधीर तांबे (Dr. Sudhir Tambe) यांची उमेदवारी तेथून जाहीर झाली. एकच नाव दिल्लीतून कसे जाहीर झालं? असा प्रश्न उपस्थित करून ही 'स्क्रीप्ट' बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांना अडचणीत आणण्यासाठी तयार केल्याचा आरोप सत्यजीत तांबे यांनी केला.

फॉर्म भरल्यानंतर एच. के. पाटील यांना फोन केले. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही वारंवार फोन केले. मात्र त्यांचे फोन बंद होते. त्यानंतर पर्याय नसल्याने मी काँग्रेसच्या वतीने फॉर्म भरला. मात्र एबी फॉर्म नसल्याने तो अपक्ष गृहित धरण्यात आल्याचा खुलासाही यावेळी तांबे यांनी केला.

तांबे म्हणाले की, मला भाजपने उघडपणे पाठिंबा दिला. मात्र काँग्रेसचा उमेदवार असल्याचं वारंवार सांगूनही प्रदेश काँग्रेसकडून विविध प्रकारचे आरोप करण्यात आलं. तसेच शिस्तभंग केला म्हणून करवाई केली. यानंतरही चर्चा करण्यावर भर दिला, त्यावेळी चुकी नसतानाही माफी मागण्यास सांगितली. त्यानुसार माफीही मागितली, असं म्हणत त्यांनी एच. के. पाटील यांना पाठविलेल्या पत्राची एक पत्र दाखविली.

Satyajeet Tambe, Nana Patole
Harshvardhan Jadhav News : राजकारणात काही नको म्हणणारे जाधव अचानक विधानसभेच्या तयारीला ? हे आहे कारण..

दरम्यान, आम्ही दिल्लीतील नेत्यांशी बोलत होतो, तसेच प्रदेश काँग्रेसशीही संपर्कात होतो. मात्र असे असतानाही महाविकास आघाडीने दुसऱ्यास उमेदवारास पाठिंबा दिला. तसेच मी, माझे कुटुंबीय भाजपचेच उमेदवार असल्याचा वारंवार खोटे सांगून जाणूनबुजून बदनामी केली. प्रदेशकाँग्रेसकडून ही बदनामी पूर्वनियोजित केल्याचा आरोपही सत्यजीत तांबे यांनी यावेळी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com