Sanjay Raut
Sanjay RautSarkarnama

Sanjay Raut : कोश्यारींच्या आरोपांवर संजय राऊत संतापले, म्हणाले, ''इधर उधर की बात..''

Maharashtra Politics: आम्ही त्यांच्या वयाचा आदर राखला, पण ते भाजप नेत्याच्या प्रचारासारखंच वागत होते...

Sanjay Raut On Bhagat Singh Koshyari: माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अखेर महाविकास आघाडी सरकारच्या काळातील विधान परिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ते पाच पानी पत्र पाठवलं नसतं, तर मी दुसऱ्याच दिवशी १२ आमदारांच्या नियुक्तीसंदर्भात मंत्रिमंडळाने केलेल्या शिफारशींवर सही करणार होतो असं कोश्यारी यांनी म्हणाले आहेत. आता या आरोपावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यासह शिंदे गट, निवडणूक आयोग यांच्यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं आहे.

राऊत म्हणाले, राज्यपाल कोश्यारी हे खोट बोलत आहे. कॅबिनेटने एखादी शिफारस केली असेल तर 72 तासांमध्ये मंजूर करायची असते. उगाच 'इधर उधर की बात मत कर' का ते करताहेत अशी विचारणा केली.कॅबिनेटची मंजुरी करणे हे राज्यपालांचे घटनात्मक कर्तव्य आहे. यावरती त्यांनी बोलावं उगाच इकडल्या तिकडल्या गोष्टी करू नये. मंडळाच्या शिफारशी त्यांनी का मान्य केला नाही हे त्यांनी आधी सांगावं असंही राऊत म्हणाले.

Sanjay Raut
Ashok Chavan News : माझा विनायक मेटे करण्याची चर्चा : अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप, नेमकं काय म्हणाले...

यावेळी कोश्यारी हे वयाने ज्येष्ठ नेते आहे. आम्ही त्यांच्या वयाचा आदर राखला, पण ते भाजप नेत्याच्या प्रचारासारखंच वागत होते. त्यांनी मंत्रिमंडळाच्या शिफारसी का मान्य केल्या नाही, हे त्यांनी सांगावं अशा शब्दांत संजय राऊतांनी(Sanjay Raut) कोश्यारींवर आगपाखड केली आहे.

तसेच कोश्यारी आता राज्यपालपदावरून उतरले आहे. त्यांचे विधान हे राजकीय आहे. ते जेव्हा राज्यपाल होते, तेव्हा महाविकास आघाडीचे बहुमतातील सरकार होते. त्यांनी सरकारच्या निर्णयाचा आदर केला पाहिजे होता. पण, त्यांनी राजभवन हा भाजप(BJP) नेत्यांचा अड्डा केला होता असा हल्लाबोलही राऊत यांनी यावेळी केला.

Sanjay Raut
Shivsena News: नागपुरातील शिवसेना भवनाचे भाडेच भरले नाही, अन् उद्धव ठाकरे म्हणतात लढा !

शिवसेनेच्या बाबतीत निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा महाराष्ट्र आणि शिवसेनेवर अन्याय करणारा निर्णय आहे. म्हणून सर्वोच्च न्यायालय हा या देशातल्या जनतेसाठी लोकशाहीसाठी शेवटचा आशेचा किरण आहे.

शिवसेना निवडणूक आयोगाच्या अतिरेकी निर्णयावर सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आम्हांला खात्री आहे की, मुख्य न्यायाधीश खंडपीठ सर्वोच्च न्यायालय या देशात लोकशाहीच्या संदर्भात काय चाललंय याचा विचार करून वाचवण्याचा निर्णय घेतील.

सर्वोच्च न्यायालय (Supreme Court)हे शेवटचा आशेचा किरण उरला आहे. सर्व यंत्रणा ही गुलाम म्हणून काम करताना पाहतोय. तसं नसतं तर शिवसेनेच्या बाबतीत जो निर्णय हा अन्यायकारक आहे, तो तसा आला नसता. सर्वोच्च न्यायालय हा शेवटा किरण आहे. निवडणूक आयोगाच्या अतिरेकी निर्णयावरून कोर्टात याचिका दाखल केली आहे. देशात राजकीय परिस्थितीत कशी आहे, लोकशाही ही वंधस्तंभाकडे चालला आहे, त्याला पाहून न्यायालय निर्णय देईल असा विश्वास राऊतांनी व्यक्त केला.

तसेच निवडणूक आयोगाचा निर्णय एकतर्फी, मेरी मर्जीवाला आहे. शिवसेना(Shivsena) नाव आणि चिन्ह दडपशाही, पैसा आणि सत्तेचा वापर करून दिला आहे. यासाठी 2000 कोटींचे पॅकेज वापरले आहे म्हणून सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे, असंही राऊत म्हणाले. मी पुन्हा दोन हजार कोटीचा पॅकेज हा शब्द पुन्हा वापरत आहे मला याचे काय परिणाम होणार याची पूर्ण कल्पना आहे. म्हणून आम्ही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे असंही राऊत यावेळी म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com