महाविकास आघाडी म्हणजे मिनी युपीए'च! राऊतांचा ममतांच्या मनसुब्यांना सुरुंग

संजय राऊत आज राहुल गांधींना भेटणार
Sanajay Raut
Sanajay Raut

नवी दिल्ली : ''राज्यात काँग्रेस (Congress) आमच्यासोबत सत्तेत आहे. 3 पक्षात संवाद असावा म्हणून आम्ही भेटतो. किमान समान कार्यक्रमावर आम्ही सरकार चालवतो. महाविकास आघाडी सरकारमध्ये 3 भिन्न पक्ष आहेत. म्हणजेच महाराष्ट्रात (Maharashtra) मिनी युपीएचं सरकार आहे, ''असं शिवसेना (Shivsena) खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banarjee) गेल्या आठवड्यात महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी देशात भाजपला मजबूत पर्याय देण्यासाठी कॉंग्रेस शिवाय वेगळी आघाडी बनवण्यासंबंधीचा प्रस्ताव राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या समोर ठेवला होता. मात्र शिवसेनेने या प्रस्तावावर सामना'च्या अग्रलेखातून नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आजही त्यांनी माध्यमांशी साधलेल्या संवादात असे विधान करुन ममतांच्या मनसुब्यांना सुरुंग लावला आहे.

Sanajay Raut
दिलीप वळसे पाटलांची बाजी : जिल्हा बँकेत पहिले मंत्री बिनविरोध

आगामी पाच राज्यांच्या निवडणूकांच्या पार्श्वभुमीवर गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत मोठी खलबंत सुरु आहेत. तर महाराष्ट्रातही शिवसेना युपीएत सामील होणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आलं आहे. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ते आज कॉंग्रेस खासदार राहुल गांधीना भेटणार असल्याचं सांगत युतीच्या विषयावर भाष्य केलं आहे.

''या चर्चा आमच्यात झाल्या नाहीत. पण मी आज राहुल गांधींना भेटणार आहे. आमचा नेहमी संवाद होत असतो. पण गोवा आणि उत्तरप्रदेशात होणाऱ्या आगामी निवडणूकांमध्ये कॉंग्रेससोबत जायचे की नाही यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे निर्णय घेणार आहेत. देशात भाजपविरोधात विरोधी पक्षांची आघाडी मजबूत व्हावी, हे शरद पवार यांचेही हे म्हणणे आहे. त्यासाठीच आम्ही सगळे एकत्र आलो आहोत, असही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

तसेच, महाराष्ट्र आणि गोव्याचं नातं वेगळं आहे. गोव्यात शिवसेना स्वतंत्र लढाईचा विचार करत आहे. गोव्यातील जनतेची मानसिकता वेगळी आहे. गोव्यात तृणमूल कॉंग्रेसही निवडणूकीच्या रिंगणात आहे, ही चांगली गोष्ट आहे. गोव्यात एकवेळ शिवसेना स्वतंत्र लढेल, पण कोणत्या आघाडीत जाणार नाही, असं सांगत त्यांनी यूपीएमध्ये सामील होण्याबाबत पक्षप्रमुख उध्दव ठाकरे निर्णय घेतील, याचा पुनरुच्चार केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com