रोखठोक संजय राऊतांचे व्याही सनदी अधिकारी; जावई काय करतो?

सोमवारी पुर्वशी आणि मल्हार नार्वेकर हे जोडपे लग्नबंधनात अडकणार
Sanjay Raut-Rajesh Narjevkar
Sanjay Raut-Rajesh NarjevkarSarkarnama

मुंबई : रोखठोक वक्तव्यांनी विरोधकांना धारेवर धरणारे शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सध्या मुलगी पुर्वशी राऊत यांच्या लग्नाच्या तयारीत व्यस्त आहेत. सोमवारी (२९ नोव्हेंबर) रोजी पुर्वशी आणि मल्हार नार्वेकर (Purvashi-Malhar Weeding) हे जोडपे लग्नबंधनात अडकणार आहे. या लग्नाच्या निमित्ताने कायम आक्रमक असणाऱ्या राऊत यांचा अनोखा अंदाज बघायला मिळत आहे. लग्नाच्या पुर्वसंध्येला पार पडलेल्या संगीत कार्यक्रमात संजय राऊत आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर चांगलाच व्हायरल होत आहे.

Sanjay Raut-Rajesh Narjevkar
मूड महाराष्ट्राचा : फडणवीस-अजितदादांचा शपथविधी पुन्हा नकोच!

पण या लग्नाआधी रोकठोक आणि आक्रमक संजय राऊत यांचे व्याही आणि जावई कोण आहेत, याची चर्चा सुरु झाली आहे. तर संजय राऊत यांचे व्याही राजेश नार्वेकर ( IAS Rajesh Narvekar) हे सनदी अधिकारी आहेत. ठाण्याचे जिल्हाधिकारी (Thane District Collector) म्हणून ते सध्या जबाबदारी पार पाडत आहेत. यापुर्वी त्यांनी रत्नागिरी आणि रायगड या जिल्ह्यांमध्ये जबाबदारी पार पाडली आहे. या दरम्यान ग्रामीण भागात स्वच्छ भारत अभियान आणि पंतप्रधान आवास या योजना प्रभावीपणे राबवणारे अधिकारी म्हणून त्यांचा उल्लेख केला जातो. त्यानंतर २०१८ मध्ये राजेश नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांचे सहसचिव म्हणून त्यांनी काम पाहिले.

Sanjay Raut-Rajesh Narjevkar
मूड महाराष्ट्राचा : आज निवडणूका झाल्यास जनतेच्या मनातील मुख्यमंत्री कोण?
Malhar Narvekar-Purvshi Raut
Malhar Narvekar-Purvshi RautSarkarnama

राऊत यांचे होणारे जावई आणि राजेश नार्वेकर यांचा मुलगा मल्हार हे उच्चशिक्षीत असून आयटी इंजीनियर आहेत. तसेच त्यांचा स्वतंत्र व्यवसाय असल्याचेही सूत्रांनी सांगितले. संजय राऊत यांची मुलगी पूर्वशी राऊत या देखील उच्चशिक्षित असून ‘ठाकरे’ या चित्रपटाच्या त्या निर्मात्या होत्या. मुंबईतील सायन इथे त्यांचे कार्यालय आहे. याच वर्षातील ३१ जानेवारी रोजी पुर्वशी आणि मल्हार यांचा साखरपूडा पार पडला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com