बिगूल वाजला : राज्यातील १३ महापालिकांमधील आरक्षण सोडत ३१ मे रोजी!

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोगाचे आणखी एक पाऊल पुढे, १३ महापालिकांचे आरक्षण महिनाअखेरीस करणार जाहीर
 Pune Municipal Corporation
Pune Municipal Corporationsarkarnama

पिंपरी : ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC Reservation) राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक घेण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्य निवडणूक आयोग कामाला लागला आहे. महापालिकांची (Corporations) प्रभाग रचना अंतिम केल्यानंतर आता तेथील आरक्षणाची (Reservation) सोडत येत्या ३१ मे रोजी काढण्यात येणार आहे. त्यामुळे निवडणुकीचे चित्र काहीसे स्पष्ट होणार असून इच्छूकांची मोर्चेबांधणी सुरु होणार आहे. (Reservation in 13 Municipal Corporations in the state will be announced on 31st May)

पिंपरी-चिंचवड, पुणे, कोल्हापूर, नाशिक, सोलापूर, ठाणे, उल्हासनगर, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, नागपूर, अमरावती, अकोला या १३ महापालिकांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आयोगाने आज जाहीर केला. येत्या १३ जूनला आरक्षण अंतिम होऊन ते प्रसिद्ध होणार आहे.

 Pune Municipal Corporation
संभाजीराजेंबाबत जो खेळ लावण्यात आलाय, तो थांबवा; अन्यथा... : मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

या तेरांपैकी बहुतांश पालिका हद्दीत त्यातही नवी मुंबई, कोल्हापूर, पुणे, पिंपरी-चिंचवड, वसई-विरार, उल्हासनगर, कल्याण-डोंबीवलीमध्ये जून, जुलैमध्ये मोठा पाऊस होतो. त्यामुळे आरक्षण फायनलनंतरचा दीड महिन्याचा निवडणूक प्रक्रियेचा कालावधी लक्षात घेता या पालिकांमध्ये पावसाळ्यात नाही, तर तो संपल्यानंतर सप्टेंबर वा ऑक्टोबरच्या सुरुवातीस या निवडणूका होतील, असा अंदाज आहे. तसेच, तोपर्यंत ओबीसी आरक्षणावरही न्यायालयाचा निकाल येण्याची शक्यता असल्याने कळीचा मुद्दा ठरलेल्या ओबीसी आरक्षणासह या निवडणूका होण्याचा संभव आहे.

 Pune Municipal Corporation
राजगड कारखाना दलबदलू नेत्यांच्या पुनर्वसनाचा अड्डा नव्हे : भाजप पदाधिकाऱ्याने डागली तोफ!

स्थानिक स्वराज्य संस्थांत पन्नास टक्के महिला आरक्षण आहे. त्यानुसार २२ एससी (अनुसूचित जाती), तर तीन एसटी (अनुसूचित जमाती) महिलांच्या जागा पिंपरी-चिंचवड महापालिकेत राखीव आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये या वेळी एकूण १३९ जागा आहेत. गतवेळी २०१७ च्या निवडणुकीत त्या १२८ होत्या, त्यामुळे आगामी निवडणुकीनंतर किमान ७० महिला पालिकेत असतील.

 Pune Municipal Corporation
महाआघाडी आणि अमोल कोल्हेंमुळे बैलगाडा शर्यती सुरू झाल्या : सुप्रिया सुळे

या सर्वसाधारण (ओपन) आणि एससी, एसटची महिला जागांचे आरक्षण ३१ तारखेला काढण्याचा आदेश आयोगाने पालिकेला दिला आहे. त्यासाठीची जाहीर नोटीस २७ तारखेला निघेल. आरक्षण काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध केले जाईल. ता. १ ते ६ जूनपर्यंत त्यावर हरकती आणि सूचना मागवण्यात येणार आहेत. त्यांचा विचार करून १३ जून रोजी अंतिम आरक्षण राजपत्रात प्रसिद्ध केले जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in