Raosaheb Danve : चंद्रकांत खैरे म्हणजे विझलेला दिवा, मी त्याला काडी लावू इच्छित नाही..

राज्यातील ओबीसी, मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणाचे हे सरकार मारेकरी असल्याची टीका देखील दानवे यांनी केली. ( Bjp)
Raosaheb Danve-Chandrakant Khaire
Raosaheb Danve-Chandrakant KhaireSarkarnama

रत्नागिरी : औरंगाबादेत झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेला भाजपने आर्थिक रसद पुरवल्याचा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरेंनी (Chandrakant Khaire) केला होता. यावर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांना प्रतिक्रिया विचारली असता, विझलेल्या दिव्याला मी काडी लावू इच्छित नाही, अशा शब्दात दानवे यांनी टोला लगावला. तुम्ही वारंवार मला विचारून विझलेल्या दिव्याला आगकाडी लावायला लावू नका, असेही दानवे म्हणाले.

कोरोना काळात आपले छत्र गमावलेल्या कुटुंबियांना केंद्राकडून आर्थिक मदत करण्यात येत आहे. या निमित्ताने दानवे हे रत्नागिरीत आले होते. (Maharashtra) यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत दानवेंनी विविध प्रश्नांवर आपली मतं मांडली. या दरम्यान, पत्रकारांनी दानवे यांना खैरेंनी भाजपवर केलेल्या आरोपाबद्दल छेडले, यावर दानवे यांनी वरील टीका केली.

दानवे म्हणाले, राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे शेतकरी, विद्यार्थी रोजगार, विकासकामे या सगळ्या प्रश्नांवर अपयशी ठरली आहे. राज्याचे मुख्यमंत्री दोन वर्षात मंत्रालयात आलेले नाहीत. माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणत त्यांनी दोन वर्ष काढली. राज्यातील बारा कोटी जनता ही आपली जबाबदारी आहे याचा विसर मुख्यमंत्र्यांना पडला आहे.

Raosaheb Danve-Chandrakant Khaire
Satish Chavan : आयआयएम, साई, एम्स नागपूरला गेले, कौशल्य विद्यापीठ तरी औरंगाबादेत करा..

राज्यातील ओबीसी, मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणाचे हे सरकार मारेकरी असल्याची टीका देखील दानवे यांनी केली. मध्यप्रदेश सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानूसार इम्पेरिकल डाटा सादर केला, त्यामुळे तिथे ओबोसींचे आरक्षण कायम राहिले. राज्य सरकारला मात्र हे करता आले नाही. त्यांनी केवळ केंद्राकडे बोट दाखवून आपल्या अपयशाचे खापर आमच्यावर फोडण्याचे काम केले.

राज्यसभा निवडणुकीसाठी संभाजीराजे छत्रपती यांना दिलेला शब्द शिवसेनेने पाळला नाही हे वेगळं सांगण्याची गरज नाही. उलट गेल्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संभाजीराजे हे राजे आहेत, त्यांना आपण कुठल्याही निवडणुकीला सामोरे जाऊ देता कामा नये, अशी भूमिका घेत त्यांना राष्ट्रपतींच्या कोट्यातून राज्यसभेवर पाठवले होते. त्यामुळे राजेंचा योग्य सन्मान कुणी केला आणि शब्द कोणी मोडला हे जनतेला वेगळं सांगण्याची गरज नाही, असेही दानवे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com