डिसले गुरूजींची जागतिक बॅंकेच्या सल्लागार पदी नियुक्ती खोटी? : नेमके सत्य काय?

Dr. Ranjitsinh Disale | Global Teacher : जागतिक बँकेच्या सल्लागार पदी नियुक्ती झालीच नाही?
Ranjitsinh Disale
Ranjitsinh Disale Sarkarnama

कामावर न येताही तीन वर्षे पगार घेणे, अधिकाऱ्यांनी मानसिक त्रास दिल्याचा आणि पैसे मागितल्याचा खळबळजनक दावा करणे या प्रकरणी अडचणीत ग्लोबल टिचर रणजितसिंह डिसले यापूर्वीच अडचणीत आले आहेत. त्यांना तब्बल ३५ महिन्यांचा पगार परत करावा लागणार आहे. त्यानंतर आता आणखी एका गोष्टीमुळे डिसले यांच्याबाबत सोशल मिडीयावर चर्चा सुरु आहेत. आपल्याला जागतिक बँकेने सल्लागार म्हणून नियुक्त केले असल्याचा दावा गतवर्षी डिसले गुरुजींनी केला होता. मात्र हा दावा धादांत खोटा असल्याच्या चर्चा सोशल मिडीयावर सुरु आहेत.

जागतिक बॅंकेच्या वतीने जगभरातील शिक्षकांच्या सेवांतर्गत प्रशिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी ग्लोबल कोच नावाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी जागतिक बँकेने सल्लागार म्हणून आपली नियुक्ती केली आहे, असा दावा गतवर्षीच्या जून महिन्यामध्ये ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले यांनी केला होता. माझ्यासहित जगभरातील १२ व्यक्तींची निवड करण्यात आली असल्याचेही डिसले यांनी सांगितले होते. २०२१ ते जून २०२४ या कालावधीकरिता ही नेमणूक करण्यात आली आहे, असेही सांगण्यात आले होते.

Ranjitsinh Disale
पराभूत उमेदवार १५ दिवसांसाठी होणार नगरसेवक; शिवसेनेला लागली लॉटरी

मात्र हा दावा खोटा असल्याचे सांगितले जात आहे. खुद्द जागतिक बँकेने याप्रकरणी खुलासा केला असल्याचेही बोलले जात आहे. ट्विटर युजर आणि पुण्याचे रहिवासी वैभव कोकाट यांनी याबाबत ट्विट केले आहे. कोकाट यांनी जागतिक बँकेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांना डिसले यांच्या सल्लागार नियुक्तीबाबत खात्री करण्यासाठी काही दिवसांपूर्वी मेल केला होता. त्यासोबत त्यांनी भारतातील काही इंग्रजी माध्यमांमधील बातम्यांच्या लिंक्स देखली पाठविल्या होत्या. डिसले यांची खरचं सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे का? असा सवाल त्यांनी विचारला होता.

यावर जागतिक बँकेने कोकट यांना उत्तर दिले असून आपण रणजितसिंह डिसले नावाच्या कोणत्याही व्यक्तीची सल्लागार म्हणून नियुक्ती केलेली नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच डिसले यांच्या नावाचे कोणतेही रेकॉर्ड नसल्याचेही वर्ल्ड बँकेने सांगितले आहे. मात्र आणखी सखोल खात्री करण्यासाठी संबंधित व्यक्तीची अजून माहिती हवी असल्याचेही बँकेने दिलेल्या उत्तरात म्हटले आहे. यावर कोकट यांनी ट्विटर वरुन या सर्वांबाबत नेमके सत्य काय आहे? याचा खुसाला करण्याचे आवाहन केले आहे.

याबाबत 'सरकारनामा'ने रणजितसिंह डिसले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी हा दावा फेटाळून लावला आहे. ते म्हणाले, याबाबत आपण जून २०२१ मध्येच वर्ल्ड बँकेचे सल्लागार म्हणून नियुक्ती झाल्याचे पत्र ट्विटरवर शेअर केले होते. केवळ आपल्याला बदनाम करण्यासाठी अशा अफवा पसरवल्या जात आहेत. यात कोणतेही तत्थ नाही. दरम्यान डिसले यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांच्या ट्विटरवर हॅन्डेलवर तपासले असता असे कोणतेही पत्र 'सरकारनामा'ला आढळून आले नाही.

ग्लोबल टीचर पुरस्काराची नोंदच नाही

काही दिवसांपूर्वी अमेरिकेतील फुलब्राईट शिष्यवृत्तीसाठी रजा मिळत नसल्याने डिसले यांनी उघडपणे नाराजी व्यक्‍त केली होती. याचबरोबर नोकरीचा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती. यासह अनेक आरोप केले होते. त्यांच्या आरोपामुळे शिक्षण विभागाची बदनामी झाल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. डिसले यांना ग्लोबल टिचर पुरस्कार कशासाठी मिळाला, त्यांनी त्यात सहभाग कसा घेतला, त्यासाठी शालेय शिक्षण विभागाची परवानगी घेतली का? असे अनेक प्रश्न उपस्थित आता झाले आहेत. याबाबत कोणतीही कागदपत्रे जिल्हा परिषदेकडे नाहीत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com