
New Parliament Building Inauguration by PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 'ड्रीम प्रोजेक्ट' असलेल्या दिल्लीतील नवीन संसद भवनाचं लोकार्पण सोहळा आज (दि.२८) पार पडला. अवघ्या तीन वर्षांच्या विक्रमी कालावधीत या इमारतीचं काम पूर्ण करण्यात आलं. मात्र, या उद्घाटन सोहळ्यावरुन राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं असतानाच आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
नव्या संसद भवनाच्या लोकार्पण सोहळ्याला रविवारी सकाळी सुरुवात झाली. संसद भवन उद्घाटन कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुरोहितांनी वैदिक मंत्रोच्चारांमध्ये मोदींना सेंगोल (Sengol) म्हणजेच राजदंड सुपूर्द केला. राजदंड हातात घेण्याआधी पंतप्रधान मोदीं(Narendra Modi)नी राजदंडाला दंडवत घातला.
यानंतर त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत नवीन संसद भवनात राजदंडाची स्थापना केली.मात्र, याचवेळी या नव्या संसद भवनाच्या सोहळ्यावर काही विरोधकांनी बहिष्कार टाकला. तसेच काँग्रेस,राष्ट्रवादी, राजद यांसह विविध पक्षांच्या नेत्यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याऐवजी राष्ट्रपतींच्या द्रौपदी मुर्मू(Dropadi Murmu) यांच्या हस्ते करावं अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती. या मागणीसाठी देशातील तब्बल २० विरोधी पक्षांनी संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातला होता. परंतू, विरोधी पक्षांच्या मागणीला त्यांच्याविरोधाला सत्ताधाऱ्यांनी जुमानलं नाही.
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे(Raj Thackeray) यांनी नव्या संसदेच्या उद्घाटनावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी टि्वटद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ठाकरे म्हणाले, आज देशाच्या नवीन संसद भवनाचं लोकार्पण झालं. संसद भवन हे देशातील लोकशाहीचा आधारस्तंभ आहे, त्याचं औचित्य आणि गांभीर्य नव्या वास्तूत पण टिकून राहू दे.
या सोहळ्याला वादाची किनार...
या सोहळ्याला वादाची किनार उगाचच लागली, ती लागली नसती तर बरं झालं असतं. असो, या वास्तूच्या निर्माणासाठी आणि ही वास्तू ज्या लोकशाहीचं प्रतीक आहे ती लोकशाही टिकवण्यासाठी आजपर्यंत झटलेल्या प्रत्येकाचं मनापासून अभिनंदन. भारतीय लोकशाही चिरायू होवो असंही राज ठाकरे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले आहेत.
(Edited By Deepak Kulkarni)
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.