वळसे पाटील यांनी सस्पेन्स संपवला : राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देणार... पण...?

कोणाला सभा घ्यायची तर सरकार परवानगी देईल. पण. लोकांना बोलवणे आणि आपापसांत भाईचारा संपेल, अशी वक्तव्य करणे ठीक नाही. (Dilip Walse Patil)
 वळसे पाटील यांनी सस्पेन्स संपवला : राज ठाकरेंच्या सभेला परवानगी देणार... पण...?
Dilip Walse Patil-Raj ThackeraySarkarnama

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या १ मे रोजीच्या औरंगाबादेतील जाहीर सभेला परवानगी देणार आहे. औरंगाबाद पोलिस या संदर्भात निर्णय घेतील. (MNS) कुणाच्या सभेला विरोधाची महाविकास आघाडीची भूमिका नाही. पण महाराष्ट्रातील समाजासमाजामध्ये असणारा एकोपा, सलोखा बिघडवण्याचा कुणी प्रयत्न करू नका. कायद्याने, नियमाने पुढे जाता येईल, पण राज्यात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी स्पष्ट केले.

मुंबईत पत्रकारांशी बोलतांना त्यांनी राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) सभेला परवानगी देणार असल्याचे स्पष्ट केले. या शिवाय इतर विषयांवर देखील पाटील यांनी आपले मत व्यक्त केले. (Maharashtra) वळसे पाटील म्हणाले, प्रत्येकाला सभा घेण्याचे आणि आपले मत मांडण्याचा अधिकार आहे. महाविकास आघाडी सरकार कुणाच्याही सभेच्या विरोधात नाही. परंतु राज्यातील सामाजिक सलोखा, एकोपा बिघडवण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही.

राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी औरंगाबादचे पोलिस देणार आहेत, पण राज्यात अशांतता निर्माण करण्याचे प्रकार सहन केले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. खार पोलिस स्टेशन बाहेर भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. या हल्ल्यात त्यांच्या हनुवटीला मार लागून रक्त आले होते. यावर रुग्णालयाचा अहवाल आला आहे. त्यात सगळ्या गोष्टी स्पष्ट झालेल्या आहेत, त्यामुळे यावर अजून काय बोलणार? असे सागंत पाटील यांनी या विषयावर बोलणे टाळले.

राणा दाम्प्त्याने युसुफ लकडावाला यांच्याकडून ८० लाख रुपये कर्ज घेतल्याचा आरोप शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. निवडणूक शपथपत्रातील उल्लेखावर हा आरोप आधारित आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी करणार असल्याचेही वळसे पाटील यांनी यावेळी सांगितले.

पवारांकडूनही राजसभेला हिरवा कंदील..

राज ठाकरे यांच्या १ मे रोजीच्या औरंगाबादेतील सभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी देखील हिरवा कंदील दर्शवला आहे. मुंबईत एका इफ्तार कार्यक्रमात बोलतांना पवारांनी या सभे संदर्भात भाष्य केले. ते म्हणाले, कोणाला सभा घ्यायची तर सरकार परवानगी देईल. पण. लोकांना बोलवणे आणि आपापसांत भाईचारा संपेल, अशी वक्तव्य करणे ठीक नाही. समाजात भांडणे लावणे, हे योग्य नाही. पोलिसांच्या विरोधात आरोप केले जातात. वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न सुरु असल्याबद्दल पवार यांनी यावेळी नाराजी व्यक्त केली होती.

Dilip Walse Patil-Raj Thackeray
MNS : राज ठाकरेंच्या भूमिकेमुळे अनेक नास्तिक हे आस्तिक झाले.. देवळात जाऊ लागलेत..

दरम्यान, औरंगाबादेत आज मनसेचे नेते बाळा नांदगावकर हे सायंकाळी दाखल झाले. त्यांनी विमानतळावरून थेट राज ठाकरे यांची सभा ज्या मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर होणार आहे, त्या मैदानावर जाऊन पाहणी केली. तत्पुर्वीच पोलिस अधिकाऱ्यांनी देखील या मैदानाची पाहणी केली होती. राज ठाकरे यांच्या सभेला परवानगी मिळावी यासाठी पोलिस आयुक्त डाॅ. निखिल गुप्ता यांच्याकडे स्थानिक नेत्यांनी आठवडाभरापुर्वीच अर्ज केला होता. परंतु अद्याप त्यावर निर्णय घेण्यात आलेला नाही.

या पार्श्वभूमीवर बाळा नांदगावकर यांच्या अध्यक्षतेखाली मनसेचे एक शिष्टमंडळ पोलिस आयुक्तांच्या भेटीला सायंकाळी गेले होते. परंतु पोलिस आयुक्तांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्वाची बैठक सुरू असल्याने या भेटीला विलंब झाला. नांदगावकर यांनी आम्हाला सभेसाठी परवानगी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला होता. आपले पोलिस आयुक्तांशी सातत्याने बोलणे देखील सुरू असल्याचे ते म्हणाले होते. पोलिस आयुक्त डाॅ. निखील गुप्ता यांनी देखील प्रसार माध्यमांना सभेच्या परवानगी संदर्भात आपण उद्या निर्णय घेणार असल्याचे सांगितले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.