...अन्यथा राज्यात असंतोषाचा उद्रेक होईल : राज ठाकरेंचा मुख्यमंत्र्यांना सूचक इशारा

ऐन दिवाळीच्या दिवसांत कर्मचाऱ्यांना सेवा समाप्ती करवाई करण्यात येईल, अशा नोटीसा एसटी महामंडळाने बजावल्या आहेत.
Raj Thackeray_Uddhav Thackeray
Raj Thackeray_Uddhav ThackeraySarkarnama

मुंबई : एसटी महामंडळाचे राज्य सरकारच्या सेवेत विलीनीकरणाच्या मागणीसाठी उपोषण किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती किंवा अन्य कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये; अन्यथा, कर्मचारी-कामगारांमधील असंतोषाचा उद्रेक होईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून दिला आहे. (Raj Thackeray's letter to Chief Minister Uddhav Thackeray regarding ST employees)

राज्यातील एसटीचे कर्मचारी हे आपल्या मागण्यांसाठी मागील अनेक दिवसांपासून आंदोलन करत आहेत. त्यांना पाठिंबा दर्शवत आंदोलनकर्त्यांवर कारवाई झाल्यास राज्यात असंतोषाचा उद्रेक होईल, असे राज यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.

Raj Thackeray_Uddhav Thackeray
‘कृष्णकुंज’ सोडण्याचा राज ठाकरेंचा निर्णय

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात राज यांनी म्हटले आहे की, कोरोनासारख्या महामारीच्या काळातही सर्वोत्तम कामगिरी बजावूनही आर्थिक समस्यांमुळे हताश झालेल्या तीसहून अधिक एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यातच एसटी महामंडळाला राज्य सरकारमध्ये विलिन करा, ही एसटी कर्मचाऱ्याची प्रमुख मागणी मान्य करण्याबाबत सरकारकडून अद्याप कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. अनेक आगारांमधील काम ठप्प आहे, ज्या आगारांमध्ये काम सुरू आहे. तिथेही असंतोष खदखदत आहेच. अशा स्थितीत ऐन दिवाळीच्या दिवसांत कर्मचाऱ्यांना सेवा समाप्ती करवाई करण्यात येईल, अशा नोटीसा एसटी महामंडळाने बजावल्या आहेत. दबावतंत्राचा अवलंब करून कर्मचाऱ्यांना कामावर रूजू करून घेण्यात येत आहे.

Raj Thackeray_Uddhav Thackeray
शिवसेनेला राज्याबाहेर पहिला खासदार मिळवून देण्यात पिंपरीकरांचा सिंहाचा वाटा!

सातत्याने विलंबाने मिळणारे वेतन, आर्थिक समस्यांमुळे एसटी कर्मचाऱ्यांनी केलेल्या आत्महत्या आणि महामंडळाच्या गैरकारभारामुळे कर्मचाऱ्यांच्या मनात निर्माण झालेला अविश्वास या गोष्टींंमुळे एसटी कर्मचाऱ्यांमधील असंतोषचा भडका उडला आहे.

आज गरज आहे, ती एसटी कर्मचाऱ्यांच्या गरजा आणि भावना समजून घेण्याची. ‘एसटी कर्मचारी आणि कामगार जगला, तर एसटी जगेल,’ हे भान बाळगण्याची. माझी आपणांस आग्रहाची विनंती आहे की एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलिनकरणाच्या मागणीसाठी उपोषण किंवा आंदोलनात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्ती अथवा अन्य कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये; अन्यथा कर्मचारी आणि कामगारांमधील असंतोषाचा उद्रेक होईल.

माझ्या या मागणीचा आपण गांभीर्यपूर्वक विचार कराल, तसेच योग्य तो आदेश परिवहन मंत्री आणि महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना द्याल, अशी अपेक्षा आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com