राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगडाला भेट देणार

खासदार संभाजीराजेंनी राष्ट्रपती कोविंद (president ramnath kovind) यांना रायगड भेटीसाठी निमंत्रण दिले होते, हे निमंत्रण राष्ट्रपतींनी स्वीकारले आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगडाला भेट देणार
president ramnath kovindsarkarnama

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज (chhatrapati shivaji maharaj)यांना अभिवादन करण्यासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे ता. ७ डिसेंबर रोजी दुर्गराज रायगडावर येत आहे, अशी माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. संभाजीराजे टि्वट करीत ही माहिती दिली आहे.

खासदार संभाजीराजेंनी राष्ट्रपती कोविंद (president ramnath kovind) यांना रायगड भेटीसाठी निमंत्रण दिले होते, हे निमंत्रण राष्ट्रपतींनी स्वीकारले आहे. आपल्या टि्वटमध्ये संभाजीराजे म्हणतात की, राष्ट्रपती श्री रामनाथ कोविंद यांना मी दुर्गराज रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते. यास प्रतिसाद देत राष्ट्रपती महोदय दि. ७ डिसेंबर रोजी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी रायगडास भेट देत आहेत, हि आपल्या सर्वांसाठीच गौरवास्पद बाब आहे.

मराठा आरक्षणाबाबत संभाजीराजेनी शिवसेना, कॉग्रेस, राष्ट्रवादी कॉग्रेसच्या खासदारांची भेट घेतली होती. दोन सप्टेंबर रोजी त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. या भेटीत त्यांनी राष्ट्रपतींना रायगडाला भेट देण्याचे निमंत्रण दिले होते. हे निमंत्रण राष्ट्रपतींनी स्वीकारले आहेत.

president ramnath kovind
अधिवेशनाच्या संभ्रमात विधिमंडळ कर्मचारी भरतीप्रक्रिया रखडली

मराठा आरक्षणाबाबत खासदार संभाजीराजें (Sambhaji Raje) अक्शन मोडमध्ये आले आहेत. मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारनं काही निर्णय घेतला नाही तर, आमच्याकडं दुसरा पर्याय राहणार नाही. तसेच पुणे ते मुंबई लॉंग मार्च निघणार, असाही इशारा त्यांनी दिलाय. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरही त्यांनी भाष्य केलय.

"मी नेहमीच मराठा आरक्षणाचा मुद्दा केंद्र आणि राज्य सरकारसमोर मांडलाय. तसेच त्यांची जबाबदारी काय? हे ही मी सांगितलंय. आरक्षणाचा विषय लगेच मार्गी लागण्यासारखा नाही. परंतु, राज्य शासनानं मागासवर्गीय आयोग स्थापन अथवा कमिटी करण्याची जबाबदारी घ्यायला हवी. यातून सर्वेक्षण करायला हवं. कारण सामाजिक मागास राहिलेलाच नाही. सामाजिक मागास सिद्ध करण्यासाठी हे पहिलं नियोजन आहे. पुढचं हे काहीच होत नसेल तर केंद्रात जाऊ. पण सध्या केंद्राचा विषय नाही", असंही त्यांनी म्हटलंय.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in