प्रकाश आंबेडकर काँग्रेसकडून राज्यसभेवर? वंचित बहुजन आघाडीने स्पष्टचं सांगितले!

Prakash Ambedkar | Vanchit Bahujan Aaghadi : काँग्रेस-वंचित बहुजन आघाडी युतीच्या पुन्हा चर्चा
Prakash Ambedkar | Vanchit Bahujan Aaghadi
Prakash Ambedkar | Vanchit Bahujan AaghadiFacebook

अकोला : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या ६ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यापैकी २ जागा भाजप, १ शिवसेना, १ राष्ट्रवादी आणि १ काँग्रेसच्या वाट्याला येणार आहे. तर एका जागेबाबत अद्याप चुरस पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून (NCP) विद्यमान खासदार प्रफुल्ल पटेल (Prafful Patel) आणि शिवसेनेकडून (Shivsena) संजय राऊत (Sanjay Raut) यांची नाव जवळपास अंतिम मानली जात आहेत. तर काँग्रेसच्या वाट्याला आलेल्या एका जागेवरुन वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aaghadi) प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना राज्यसभेवर पाठवणार असल्याच्या चर्चा आहेत.

मात्र या केवळ चर्चा आणि अफवा असल्याचे आता वंचित बहुजन आघाडीच्या वतीने स्पष्ट करण्यात आले असून या वृत्ताचे खंडनही करण्यात आले आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष सिद्धार्थ मोकळे याबाबत बोलताना म्हणाले, प्रकाश आंबेडकर यांना काँग्रेसकडून राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याची बातमी माध्यमांमधून प्रसारित करण्यात आली आहे. मात्र या बातमीमध्ये काहीही तथ्य नाही. काँग्रेसकडून आम्हाला असा कोणताही प्रस्ताव अद्याप प्राप्त झालेला नाही. निवडणुका जवळ आल्या की काँग्रेसमधील एक गट माध्यमातील काही लोकांना हाताशी धरून खोट्या बातम्या पेरण्याचे काम करीत असतो. अशा खोट्या बातम्या पेरून मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा व वंचित बहुजन आघाडीची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Prakash Ambedkar | Vanchit Bahujan Aaghadi
फक्त शिवसेनेचा प्रचार करायचा : मुख्यमंत्र्यांच्या अटीवर संभाजीराजेंनी डोके खाजवले...

अकोला जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीने प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषदेवर सत्ता मिळविली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय समिकरणे आंबेडकर यांच्या पक्षाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही, अशी स्थिती आहे. त्यामुळे अकोला जिल्ह्यातून काँग्रेसचे वर्चस्व हळूहळू कमी होत गेले. आंबेडकर यांचा अकोल्यात उदय झाल्यापासून गेले २५ वर्षे काँग्रेस जिल्ह्यात अस्तित्वाचा लढा लढत आहे.

Prakash Ambedkar | Vanchit Bahujan Aaghadi
ठाकरेंचे दुसरे संजयही राज्यसभेवर? शिवसेनेकडून मातोंडकर अन नार्वेकरांची चर्चा

त्यामुळे प्रत्येकवेळी निवडणुका आल्यात की काँग्रेस व प्रकाश आंबेडकर यांच्या युतीची चर्चा सुरू होते. सध्या काँग्रेसने राज्यसभेसाठी प्रकाश आंबेडकर यांना उमेदवारी देण्याबाबत चाचपणी सुरू केली असल्याचे वृत्त सर्वत्र पसरविले जात आहे, असे सांगत या वृत्ताबाबत वंचित बहुजन आघाडीतर्फे खंडन करण्यात आले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com